आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर: शेवटची अक्षता पडताच नवरदेवाचा मंडपातच मृत्यू, तरुणी ठरली क्षणांची नववधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- शेवटची अक्षता पडत असतानाच हृदयविकाराने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सायंकाळी पंढरपूर तालुक्यात घडली. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील घाडगे वस्तीवर काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. लग्नसोहळ्यात नवरदेवाचाच मृत्यू झाल्याने देगाव परिसरात एकच शोककळा पसरली.
शैलेश शिवाजी शिंदे (वय 24, रा. देगाव) असे मरण पावलेल्या नवरदेवाचे नाव आहे. शैलेश याचा काल सायंकाळी साडेसहा वाजता गोरज मुहूर्तावर विवाह होता. अक्षता पडतानाच त्याच्या छातीत दुखायला लागले होते तरीही तो बोहल्यावर थांबला. मात्र शेवटची मंगलाष्टक सुरु असताना तो स्टेजवरच कोसळला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर त्याचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
वरातीदरम्यान वाद झाल्यानेच झाला मृत्यू-
दरम्यान, शैलेशचा मृत्यू होण्याअगोदर अर्धा-पाऊण तासापूर्वी वधू व वर गटात वरातीवरून वाद झाला होता. यात चांगलीच बाचाबाची झाली होती. त्यामुळे नवरदेव शैलेश तणावात आल्याचे कळते. त्यानंतर काही वेळातच लग्नाला उभे राहिलेल्या शैलेशला ह्दयविकाराचा झटका आला व त्यातच मृत्यू झाल्याचे आता बोलले जात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो.... वाचा तरुणी ठरली केवळ क्षणांची नववधू....