आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’मुळे स्पर्धा होईल समांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘जीएसटी’नेएक देश, एक कर ही प्रणाली सुरू होईल. त्याने देशांतर्गत बाजारपेठेतील स्पर्धा कमी होण्यास मदत होणार अाहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे विविध करांच्या कचाट्यातून मुक्तता होईल, असे येथील उद्योजक, व्यापाऱ्यांना वाटते.
आंतरराज्यीय स्पर्धा संपेल
डी. राम रेड्डी, सहव्यवस्थापकीयसंचालक, बालाजी अमाइन्स : प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर असल्याने आपल्याच देशातील शेजारच्या राज्यात उत्पादने विकण्यासाठी स्पर्धा चालते. ‘जीएसटी’ने ‘एक देश, एक कर’ ही प्रणाली अंमलात येईल. त्याने आंतरराज्यातील उत्पादन विक्रीची स्पर्धा संपुष्टात येईल, असे वाटते. प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्याला करांमध्ये सुटसुटीतपणा हवा असतो. कर कायद्यातील गुंतागुंत, विवरण, परतावे या कटकटीच वाटतात. त्यातून उत्तम मार्ग काढण्यासाठीच जीएसटी मंजूर झाली. त्याचे स्वागतच केले पाहिजे.

बऱ्याच कटकटीतून मुक्तता
शरदकृष्ण ठाकरे, व्यवस्थापकीयसंचालक, लक्ष्मी हैड्रोलिक्स : देशभरात एकच कर झाल्याने बऱ्याच कटकटींतून मुक्तता होईल. अन्यथा देशातल्या उत्पादकांना अनेक कर भरावे लागतात. उत्पादन शुल्कपासून विक्रीकर भरताना अनेक प्रकारचे फॉर्म असतात. ते भरताना वेळ जातो. स्पर्धेच्या युगात समांतर करप्रणाली आवश्यकच होते. त्याने सुटसुटीतपणा येईल. किमतींवरही फारसा फरक पडणार नाही. माझ्या मते ते टक्के वाढेल, असा अंदाज आहे. पण त्याने करसंकलन वाढेल. मागे असलेल्या राज्यांचा विकास होईल. या गोष्टी सकारात्मक आहेत.

आताव्यवहार लपणार नाहीत
सीए राज मणियार, बँकिंगआणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ : जीएसटी विधेयकामुळे राज्य सरकारचे केंद्र सरकारचे करासंबंधीचे कायदे एकच होतील. त्यामुळे अप्रत्यक्ष करासंबधीचे बरेचसे कायदे कमी होतील. व्यापाऱ्यांसाठी ते सोईस्कर ठरेल. तसेच काही व्यापारी आपले आर्थिक व्यवहार लपवायचे. आता मात्र त्यांना तसे करता येणार नाही. व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता निर्माण होईल. त्यामुळे करावर तसेच संकलनावर सरकारचे चांगले नियंत्रण तयार होईल.

अधिकाधिककर संकलन होईल
डॉ. चंद्रकांत भानुमते, अर्थशास्त्रविभागप्रमुख, सोलापूर विद्यापीठ : आतापर्यंत बऱ्याच प्रकारचे कर, विविध टप्प्यांवर लागू केले गेले होते. म्हणजे सेल्सटॅक्स, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स आदी. या किचकट प्रणालीऐवजी एकच जीएसटी टॅक्स लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून कर संकलन सुलभ होईल. सध्या कर संकलित करण्याची जी यंत्रणा आहे ती बरीच किचकट आणि अवाढव्य आहे. त्यातून पळवाटाही काढले जातात. आता यावर १०० टक्के म्हणता येणार नाही, पण जास्तीत जास्त कर संकलित होऊ शकेल.

काहीस्वस्त, तर काही महाग
दरेश पाटील, सीएअसोसिएशन, सोलापूर शाखेचे अध्यक्ष : जीएसटी कर प्रणाली लागू झाल्यास करामध्ये नक्कीच सुधारणा होण्यास मदत होईल. कर प्रणाली बाबत खूप वर्षानी चांगला बदल होत आहे. व्यापारी इतर व्यावसायिकांना विविध कर भरावे लागतात. या कर प्रणालीमुळे एकच कर भरावा लागणार आहे. सुरुवातीला मध्यम वर्गातील व्यापाऱ्यावर नक्कीच परिणाम हाेईल. काही वस्तूंच्या किमती कमी होतील,तर काहींची वाढतील. त्यामुळे समान्य वर्गाला फायदा कमी प्रणात होईल.

करसुलभता निर्माण होईल
प्रा. डॉ. बद्रिनाथ दामजी, अर्थशास्त्रविभाग प्रमुख, दयानंद महाविद्यालय : जीएसटीमुळे देशभरात एकसमान आणि पारदर्शक करप्रणाली अस्तित्वात येईल. देशातील बहुविध करांऐवजी हा एकमेव कर राहणार असल्याने व्यापार, व्यवसायात सहाय्य होणार आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, अतिरिक्त उत्पादन शुल्क, सेवाकर, सीमाशुल्क, व्हॅट आणि विक्रीकरासारखे राज्यकर, करमणूक कर इत्यादी कर जीएसटीमध्ये अंतर्भूत होणार आहेत. यामुळे करसुलभता निर्माण होईल.

उद्योगाला याची गरजच होती
यतीनशहा, प्रिसिजन उद्योग समूह : जीएसटी विधेयक उद्योग जगतासाठी खूपच फायदेशीर असून याची गरज होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतामधील उद्योग गुंतवणुकीबाबतचा दृष्टिकोन बदलण्यासाठी याचा निश्चित लाभ होईल. पूर्वीची कररचना फारच किचकट होती. प्रत्येक राज्य केंद्र सरकारचे, उत्पादन विक्रीकर यांचे स्वतंत्र कर आपल्याकडे होते. जीएसटीमुळे सुटसुटीतपणा येणार असून व्यवसाय कशा पद्धतीने करावा, याबाबतची स्पष्टता उद्योजकांना येईल. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमधील काही टॅक्स कमी झाला असल्याने निश्चित हे फायदेशीर आहे.
बातम्या आणखी आहेत...