आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान करप्रणालीसाठी देशात ‘जीएसटी’ आवश्यकच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अमेरिका,इंग्लंड या विकसित देशांमध्ये समान करप्रणाली आहे. त्याने देशभरातील ग्राहकांना एकाच किमतीत वस्तू मिळतात. ही प्रणाली देशात लागू झाल्यास उत्पादक, ग्राहकांची सोय होईलच; शिवाय शासकीय महसुलातही वाढ होईल, असे नामवंत चार्टर्ड अकौंटंट मंडळींनी रविवारी येथे सांगितले.

सीए असोसिएशनच्या सोलापूर शाखेतर्फे हॉटेल त्रिपूरसुंदरी येथे कार्यशाळा झाली. त्यासाठी मुंबईतील चार्टर्ड अकौंटंट अविनाश नीलवाणी, हेमंत परब, मनोज शहा, मनीष गाडिया, अभय अरोडकर, सोलापूरचे धीरज बलदोटा अादी वक्ते आले होते. आंतरराष्ट्रीय करप्रणाली, गुड्स सर्व्हिस टॅक्स (जीएसटी), सेवाकराची छाननी, कंपनी कायद्यातील बदल आदींविषयी त्यांनी सोलापूरच्या चार्टर्ड अकौंटंटना मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद््घाटन झाले. असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी स्वागत केले. सचिव दरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष सुनील इंगळे यांनी आभार मानले. सकाळी साडेनऊपासून सायंकाळी सहापर्यंत हा कार्यक्रम रंगला. त्यासाठी सोलापूरचे चार्टर्ड अकौंटट उपस्थित होते.

लेखापरीक्षण हवे
५०लाख रुपयांच्या वर सेवाकर भरणाऱ्यांनी अंतर्गत लेखापरीक्षण करून घेण्याचे सक्तीचे अाहे. एकूण देय कर तपासताना त्यात तफावत दिसल्यास पुनर्लेखापरीक्षणाची गरज निर्माण होते.” हेमंतपरब, सीए, मुंबई

... दोन्हीकडे कर
आंतरराष्ट्रीयकरप्रणालीत अनिवासी भारतीय आणि भारतीय नागरिक अशा दोन्ही अंगांनी पडताळणी करावी. त्याने त्यांचे कर वाचतील. अन्यथा दोन्ही देशांत कर देण्याची वेळ येईल.” अविनाशनीलवाणी, अध्यक्ष, चेंबर ऑफ टॅक्स कन्सलटंट्स

जीएसटी आवश्यक
देशभरसमान करप्रणाली आणण्यासाठी ‘जीएसटी’ प्रणाली लागू करणे आवश्यक अाहे. त्याचा कायदा येणार आहे. परंतु लोकसभेत त्याचा प्रस्ताव रखडतोय. त्याला अधिक विलंब झाल्यास भरून येणारे नुकसान होईल.” मनीषगाडिया, सीए, मुंबई