Home »Maharashtra »Western Maharashtra »Solapur» GST Makes Dry Fruits Expensive

‘जीएसटी’ने सुकामेवा महाग, मिठाईवर मात्र परिणाम नाही

‘जीएसटी’ (वस्तू सेवा कर) या नव्या कर प्रणालीच्या व्यवहाराची ही पहिली िदवाळी मिठाई गोड करणारी ठरली असली तरी एकूणच परिणाम

प्रतिनिधी | Oct 09, 2017, 09:36 AM IST

  • ‘जीएसटी’ने सुकामेवा महाग, मिठाईवर मात्र परिणाम नाही
सोलापूर-‘जीएसटी’ (वस्तू सेवा कर) या नव्या कर प्रणालीच्या व्यवहाराची ही पहिली िदवाळी मिठाई गोड करणारी ठरली असली तरी एकूणच परिणाम म्हणून मागणी घटल्याचे मिठाई विक्रेत्यांनी म्हटले अाहे. तर दुसरीकडे १२ टक्के ‘जीएसटी’मुळे सुकामेवा महागला अाहे. वेगवेगळ्या सुकामेव्याचे एकच गिफ्ट पॅकेट घ्यायचे म्हटल्यावर त्यावर साधारण १५ ते १८ टक्के ‘जीएसटी’ असल्याने सुट्या खरेदीवर भर असल्याचे दिसून येत अाहे.

येत्या सोमवारपासून िदवाळीचे उत्सव सुरू होतील. त्यामुळे खरेदीची लगबग हळूहळू मार्केटमध्ये दिसू लागली अाहे. यंदाची दिवाळीची उलाढाल जीएसटीच्या कर अाकारणीवरून होत अाहे. त्याचे काही परिणाम जाणवू लागले अाहेत. सोलापुरातील मिठाई क्षेत्रावर फारसा परिणाम जाणवत नाही. मागील वर्षीचे मिठाईचे दर यंदाच्या वर्षी देखील कायम आहेत. मात्र ‘जीएसटी’च्या झालेल्या एकूण परिणामामुळे मंदी जाणवते अाहे. त्याचा मिठाई विक्रीवर २० ते २५ टक्के परिणाम झालेला आहे. विक्री घटली असल्याचे विक्रेते म्हणाले.

सुक्या मेव्यावर १२ टक्के कर लागल्याने यंदा दिवाळीसाठी भेट देण्यात येणारा ड्रायफ्रूट बॉक्सही आता काही प्रमाणात महाग झाला आहे. दिवाळीच्या सणात फराळाच्या पदार्थांना महत्त्वाचे स्थान अाहे तसेच आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार फराळ तसेच सुक्या मेव्याचे बाॅक्सचा सर्रास वापर होतो. जीएसटीमुळे सर्वच वस्तूंची भाववाढ झाली आहे. विविध प्रकारच्या मिठाई आणि चिवड्यांमध्ये या सुक्या मेव्याचा वापर केला जातो. त्यामुळे दिवाळीचा फराळदेखील या जीएसटी चक्रातून सुटलेला नाही. पॅकिंग बॉक्सचेही असेच आहे. मिनी ते जंबो अशा प्रकारातील गिफ्ट बॉक्सचे दरही वेगवेगळे आहेत. तसेच यांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रूटच्या किमतीत तब्बल टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी ड्रायफ्रूटवर टक्के कर द्यावा लागत होता. यंदा मात्र १२ टक्के कर द्यावा लागतो आहे. सुका मेव्याचे दर सातत्याने बदलत असतात. रविवारी शहरातून काही दुकानातून मिळालेले दर पुढील प्रमाणे अाहेत.

परिणाम नाही
यंदाच्यावर्षी थोड्या प्रमाणात मंदी जाणवते. यामुळे मिठाई विक्रीत घट होत आहे. जीएसटीचा मात्र फारसा परिणाम झालेला नाही.
- दीपक मोटगी, हलवाई

मिठाईत वाढ नाही
पूर्वी मिठाईवर 5 टक्के कर द्यावा लागत होता. आता देखील 5 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे मिठाईच्या किमतीवर जीएसटीचा परिणाम नाही. सोलापुरातील स्थिती चांगली आहे. त्यामुळे गिफ्टसना चांगली मागणी आहे.
- भावेश शहा, हलवाई

दर असे (प्रति किलोग्रॅम)
काजू: ८५० ते १२००
बदाम : ७००
अमेरिकन बदाम : ७०० ते ८००
मामरा बदाम : १२०० ते १५००
पिस्ता : १२०० ते १४००
नमकीन पिस्ता : ८०० ते १०००
सुगरी खारीक : २०० ते २५०
साधी खारीक : १५०
भारतीय मनुके : १५० ते २००
अफगाणी मनुके : २५० ते ३००
चारोळी : ६५० ते ७००
खसखस : ६००

सुमारे ८० रुपयांची वाढ
मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी प्रत्येक सुक्या मेव्याच्या दरात किलोमागे ५० ते ८० रुपयांची वाढ झाली आहे. सध्याला घराघरात फराळ करण्याचे काम सुरू अाहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत याचा वापर होतो. जीएसटीची झळ बसली आहे, हे सरळ सरळ दिसते.
- मल्लिकार्जुनवाले, भुसार आडत व्यापारी

Next Article

Recommended