आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्ष पदासाठी पालकमंत्री-पाटलांचे गुप्तगू, निंबर्गींची फेरनिवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: शहरध्यक्ष प्रा. निंबर्गींसह सहा मंडल अध्यक्षांची निवड जाहीर झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी उमा कापरे, रवींद्र अनासपुरे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंडल अध्यक्ष लक्ष्मीकांत गड्डम, बिपीन धुम्मा, दत्तात्रय पोसा, संदीप बंडे, सिद्धलिंग मसुती, नागनाथ शिवशिंगवाले, नगरसेवक सुरेश पाटील, गणपा आदी.
सोलापूर - भाजप शहराध्यक्ष पदासाठी दावेदार असलेले प्रा. अशोक निंबर्गी यांची एकमताने निवड करण्यात आली. या पदासाठी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील इच्छुक होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि नगरसेवक पाटील यांच्यात पक्ष कार्यालयातील बंद खोलीत गुप्तगू झाल्यानंतर प्रा. निंबर्गी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकारी उमा कापरे यांनी प्रा. निंबर्गी यांच्या नावाची घोषणा केली. याशिवाय सहा मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

दुपारी चार वाजल्यापासून सिव्हिल चौकातील भाजपा कार्यालयात गर्दी होती. सहा मंडलासाठी ६७ जणांच्या मुलाखती झाल्या. आमदार सुभाष देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आले निवडीपूर्वी गेले. निवडीनंतर नाराज गटातील नगरसेवकांचा काढता पाय घेतला. प्रा. निंबर्गी यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके उडवून जल्लोष केला. निंवडीपूर्वी शासकीय विश्रामगृहात उमा कापरे रवींद्र अनासपुरे यांच्यात चर्चा झाली होती.

बातम्या आणखी आहेत...