आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेच्या प्रवासात गुरूंना शिष्यांनी मान देणे हिच गुरुदक्षिणा : वनमाला किणीकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री सिध्देश्वर संगीत विद्यालयाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करताना वनमाला किणीकर,रघुनाथ गड्डाम,गिरिष बोरनाळे,आर.एस.पाटील,रेणुका आरोरा,संजय बागेवाडीकर आदी. - Divya Marathi
श्री सिध्देश्वर संगीत विद्यालयाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करताना वनमाला किणीकर,रघुनाथ गड्डाम,गिरिष बोरनाळे,आर.एस.पाटील,रेणुका आरोरा,संजय बागेवाडीकर आदी.
सोलापूर- कलेच्या प्रवासात शिष्य घडवल्यानंतर त्यांनी पुढे आपल्या गुरूला मान देणे आणि त्यांना वंदन करणे हिच त्या गुरूची दक्षिणा असते, असे मत सिनेनाट्य अभिनेत्री वनमाला किणीकर यांनी व्यक्त केले. त्या श्री सिद्धेश्वर संगीत विद्यालयाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. 
 
निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित कार्यक्रमास व्यासपीठावर रघुनाथ गड्डम, आर. एस. पाटील, रेणुका अरोरा, प्राचार्य संजय बागेवाडीकर यांची उपस्थिती होती. पुढे किणीकर म्हणाल्या, अनेक विद्यार्थी येतात, घडतात आणि पुढे जातात. मात्र पुढे गेल्यानंतर मागे वळून त्यांनी आपल्या गुरूंना वंदन करणे गरजेचे आहे.
 
गुरूला दुसरे काही नको असते. त्यांना केवळ आपल्या विद्यार्थ्याची प्रगती, त्याचे मोठे होणे पाहायचे असते. संगीत विद्यालयाचा उपक्रम उत्तम असून, १० वर्षे पूर्ण करणे फार अवघड गोष्ट आहे. त्याचे कौतुक वाटते.
 
रघुराज गड्डम यांच्या संस्थेने राज्यात समूह नृत्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल संगीत विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्याला पराग कुलकर्णी यांनी तबल्याची आणि श्रावणी कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ दिली. सूत्रसंचालन अलका अरगडे यांनी केले. 
 
घडले अनेक विद्यार्थी 
१० वर्षांपूर्वी बालगंधर्वांच्या जन्मदिनानिमित्त संगीत विद्यालय सुरू करण्यात आले. त्यास आर. एस. पाटील यांनी साथ दिली. तर संजय बागेवाडीकर यांनी या विद्यालयाचे पालनपोषण केले. हजारोंच्या घरात विद्यार्थी घडले. या संगीत विद्यालयामुळे संगीताचा शाळेच्या स्तरावर प्रवाह वाढला. त्यामुळे संगीताकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली. 
 
श्री सिध्देश्वर संगीत विद्यालयाच्या दहाव्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करताना वनमाला किणीकर,रघुनाथ गड्डाम,गिरिष बोरनाळे,आर.एस.पाटील,रेणुका आरोरा,संजय बागेवाडीकर आदी. 
बातम्या आणखी आहेत...