आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर दुधाचे टँकरच पेटवू, बळीराजा संघटनेचे हळणवर यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर; दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर मिळाल्यास जानेवारीपासून मुंबई, पुण्याकडे जाणारे दुधाचे टँकर पेटवून देऊ. तसेच दुष्काळी पाहणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना अडवू, असा इशारा बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर यांनी दिला. मंगळवारी (दि. ८) येथील वाखरी चौकात बळीराजा संघटनेने तासभर रास्ता रोको केला. या वेळी ते बोलत होते. उसाला योग्य दर, उजनीतून पाणी सोडावे आणि प्रत्येक शेतमालाला योग्य दाम देण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.

हळणवर म्हणाले, जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. नदीत पाणी असूनही शेतकऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले जात आहे.

उजनीचे दरवाजेही उखडून फेकू
शेतकऱ्यांनी पाठबळ दिल्यास येत्या दोन दिवसांत "तीन डी' मधून ११ गावांना कसे पाणी येत नाही ते पाहू. उजनीतूनही पाणी मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. वेळप्रसंगी शेतकऱ्यांसह उजनी धरणाचे दरवाजेही उखडून फेकू, असा इशाराही हळणवर यांनी दिला.

शुक्रवारी सर्वपक्षीय मोर्चा
पंढरपूरमंगळवेढा तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) सकाळी दहा वाजता तहसील कचेरीवर मोर्चा काढणार असल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...