आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटिझन्सकडून नववर्षाचे जंगी स्वागत शुभेच्छांची कल्पक चित्रे नि शब्दचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : सोशल मीडियातील नेटकऱ्यांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक कल्पक शुभेच्छा पोस्ट केल्या. अभिनेत्री नूतन वर्षा उसगावकर यांचे छायाचित्र वापरून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 
स्वाती वनशेट्टी यांनी फेसबुकवर चार छायाचित्रे पोस्ट केली. त्या म्हणतात, नवीन वर्षाचा पहिला दिवस पॉवरफूल वुमेन्सबरोबर सेलीब्रेट केला. महिला या कुटुंबाबरोबरच व्यावसायिक यशही मिळवून चेंज मेकरची भूमिका बजावत असल्याचे त्यांचे मत आहे. अशा चेंज मेकरला प्रत्यक्ष भेटून त्यांनी नवीन वर्षाचा पहिला दिवस सत्कारणी लावला. 

व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर एकाने पोस्ट फॉरवर्ड केली. सगळे आले का रे २०१७ मध्ये. नसेल आले तर जरा तोंडावर लिंबू पाणी मारून शुद्धीवर आणा. 
 
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता काही सेकंद कमी असताना अर्चना शिंदे यांनी सेल्फी काढून फेसबुकवर पोस्ट केली त्याखाली लिहिले.. २०१६ मधला माझा लास्ट सेल्फी.. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा 
 
पल्लवी गंभीरे यांनी फेसबुकवर लिहिले की, लहानपणी नवीन वर्ष येतं म्हणजे नेमका काय बदल होतो हे कळत नव्हतं. हे बघायला गच्चीवर जायचो. पण फटाके पाहायचो, अन् जल्लोष ऐकायचो. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हा वाटलं,
 
अरे नवीन इंग्रजी वर्षात आपण कॅलेंडर बदलतो, नवीन सालाचे कॅलेंडर वापरायला सुरुवात करतो. यालाच new year म्हणतो. एक मात्र आहे. कालचा दिवस कधीच येत नाही ना राव. इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. Feeling आत्ता आत्ता कळल्यावानी. अभिनेत्री नूतन वर्षा उसगावकर यांचे छायाचित्र जोडत नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. 
बातम्या आणखी आहेत...