आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारमुळे शेतकऱ्यांना बुरे दिन, विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - दुधाचेदर घसरले आहेत, दुष्काळाचे चित्र उभे राहिले आहे. बाजार समित्यांची उलाढाल घसरली आहे. बळीराजा दुखावला आहे. एकूणच राजकीय इच्छाशक्ती कमी झाल्याने राज्यात बुरे दिन पाहायला मिळू लागले आहे. त्याला सरकारचा कारभारच जबाबदार आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ब्रह्मदेवदादा माने यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. त्यानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. विखे-पाटील म्हणाले, ‘शासनाच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे बुरे दिन आले आहेत. पण मार्केट कमिटीत दिलीपरावांनी अच्छे दिन आणले आहेत. त्यांचे शेतकऱ्यांसाठीचे चांगले प्रयत्न आहेत. सहकार क्षेत्रात अनेकांचे योगदान द्रष्ट्या नेत्यांचा उदात्त दृष्टिकोन यामुळे विकास होत असतो. राजकीय इच्छाशक्ती कमी झाल्याने बळीराजा दुखावलाय. दुष्काळाचे हे तिसरे वर्ष आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. संबंधितवृत्त. दवि्य सिटी

ब्रह्मदेवदादा मानेंचा प्रवास वाखाणण्याजोगा...
हर्षवर्धनपाटील म्हणाले, ज्या ताकदीचा कार्यक्रम दिलीपरावांनी केला यावरून त्यांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसून येते. ब्रह्मदेवदादांचा सरपंच ते विधिमंडळ प्रवास वाखाणण्याजोगा आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री दिसत नाहीत, अशी कोपरखळी मारली. भाजप सरकारात दुधाचे दर २४ वरून २० वर आलेत. दूध, ऊस कृषिमालाला योग्य भाव मिळत नाहीत. बाजार समितीची उलाढाल ११०० कोटींवरून ९०० कोटींवर आली आहे, हे अच्छे दिन आहेत का? असा सवालही त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...