आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१.९१ लाखाची हातभट्टी जप्त, आरोपी ताब्यात, शहर गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शहर गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संतोष पापडे यांच्या विशेष दारूबंदी पथकाने मागील चार दिवसांत विविध ठिकाणी छापे मारत जवळपास लाख ९१ हजार रुपयांची हातभट्टी दारू जप्त करून नष्ट केली आहे.

यातील पहिल्या घटनेत १२ ऑगस्ट रोजी गब्बर काश्या ऊर्फ काशीनाथ सोमलू राठोड (वय ४२ रा. मुळेगाव तांडा, द. सोलापूर) याच्याकडून बोरामणी नाका येथून दारू मोटारसायकल मिळून अंदाजे किंमत ३१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात झाली आहे. दुसऱ्या घटनेत मारुती ८०० गाडीतून बाळे येथून दारूसह चार इसमांना ताब्यात घेतले. यात सागर परमेश्वर पारधे (वय २१), आकाश रमेश जाधव (२०), धर्मा काशीनाथ चव्हाण (२९), युवराज तोलाराम पवार अशी त्यांची नावे आहेत. संतोष गुरुनाथ राठोड (रा. मुळेगाव तांडा) याच्या मालकीची हातभट्टी दारू घेऊन जात असताना अंदाजे ६४० लिटर दारू सापडली. मारुती कार, मोटरसायकल हातभट्टी दारू मिळून अंदाजे लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल आहे. सर्व दारू नष्ट केली आहे. याची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे. १४ ऑगस्ट रोजी न्यू बुधवार पेठ, सदाफुले यांचे घराजवळ रिक्षातून हातभट्टी दारू पकडली आहे. आरोपी सुसुपाल किसन सदाफुले हा पळून गेला स्त्री नामे गंगूबाई किसन सदाफुले रा. ४४४, न्यू बुधवार पेठ हिला ताब्यात घेतले. रिक्षात अंदाजे ९०० लिटर दारू असून अंदाजे किंमत ६६ हजार रुपये आहे. यावेळी पथक प्रमुख पापडे यांच्यासह कर्मचारी नीलकंठ तोटदार, सोमनाथ सुरवसे, स्वप्नील कसगावडे, सूरज देशमुख, दत्तात्रय कोळेकर, चालक उमेश खरात यांनी कामगिरी बजावली. गांजाजप्त, एकाला अटक : जुनाविजापूर नाका येथे गांजा घेऊन फिरताना राहुल शिंदे (वय ३१, रा. अांबेडकरनगर) याला अटक झाली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात अाली. हवालदार अंबादास चव्हाण यांनी तक्रार दिली अाहे. राहुल हा पिशवीत गांजा बाळगून फिरत होता.
बातम्या आणखी आहेत...