आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या वॉकीटॉकीवर हेडफोनची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उत्सव काळात कंट्रोल रुमवर वॉकीटॉकीवरचा अावाज स्पष्ट ऐकू यावा, दुचाकीवरून जाताना वाहन कुठे थांबवून बोलायची वेळ येऊ नये, पोलिस खात्यातील अंतर्गत होणाऱ्या महत्वाच्या संवादाची गुप्तता टिकावी म्हणून आता अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत वॉकीटॉकीला हेडफोनची सुविधा देण्यात आली आहे.

शहरातील स्थिती, पेट्रोलिंग करताना, पोलिस बंदोबस्ताची स्थिती, सद्यस्थितीचा आढावा, अधिकारी पासून ते कर्मचारीपर्यंत सर्वांशी संपर्क, अचानक कामाची जबाबदारी बदलणे आदी सर्व कामे वॉकीटॉकीवरून केली जातात. उत्सव काळात मिरवणुकांमध्ये असताना वॉकीटॉकीचा आवाज ऐकणे अवघड जाते, दुचाकीवरून जाताना वॉकीटॉकीवरचा कॉल घेणे शक्य नसते, गोंगाटात आवाज ऐकू येत नसतो, त्यासाठी पोलिस विभागाने पहिल्यांदाच वॉकीटाॅकीला हेडफोनची सुविधा पुरविली आहे. वॉकीटॉकी हाती बाळगता कमरेला लावूनच बोलता येणार आहे. हेडफोन पुरवून दोन दिवस झाले आहेत. अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सोयीचे होत आहे.

पहिल्यांदाच अशी सुविधा
उत्सवात साऊंड सिस्टिमच्या आवाजामध्ये वॉकीटॉकीवरून करण्यात आलेला संवाद व्यवस्थित ऐकू येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व वॉकीटॉकीला पहिल्यांदाच हेडफोनची सुविधा देण्यात आली आहे.” अश्विनी सानप, सहाय्यक पोलिस आयुक्त