आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाचा ठाव घेणारा नटसम्राट, अबालवृद्ध सगळयांनाच भावला चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मराठीनाट्य सृष्टीला सोनेरी वळण देणाऱ्या नाटकाची महेश मांजरेकर यांनी केलेली ‘नटसम्राट’ चित्रपटाची नवनिर्मिती रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ठरली आहे. नाना पाटेकर, विक्रम गोखले आणि मेधा मांजरेकर यांच्या दर्जेदार अभिनयाने नटलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटाच्या वैभवात उत्कृष्ट कलाकृतीचा कळस चढविला आहे. संवाद दर्जेदार अभिनय याने दर्दी प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला आहे.

नाना पाटेकरयांचे अनेक चित्रपटे पाहिले. या चित्रपटातील त्यांचा बेलवलकर पाहून मन घायाळ झाले. मेधा मांजरेकर यांनीही हृदयाला हात घातला. प्रणय फुटाणे, प्रेक्षक

कलाकार असे
विक्रम गोखले, नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, नेहा पेंडसे, मृण्मयी देशपांडे , सुनील बर्वे, अजित परब

लहानपणापासून नटसम्राटहे नाटक आहे असे ऐकत आले होते. चित्रपट इतका सुंदर असेल तर नाटक कसे असेल याचा विचार करत आहे. दीपाली खळसोडे, प्रेक्षक

गाजलेल्या नाटकाचाहा एक पडद्यावरचा प्रयोग आहे. मात्र हा चित्रपट मनावर भुरळ घालणारा ठरतो. तो रसिकांच्या मनावर गारूड घालणारा आहे. रुपाली वाडकर, प्रेक्षक