आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या उन्हाने सोलापूर परिसरात पक्षी घायाळ, वाढते तापमान आणि पाण्याचा अभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उन्हाच्या वाढत्या तीव्रतेचा फटका माणसांबरोबर मुक्या प्राण्यांनाही बसतोय. शहर जिल्ह्यात उन्हाच्या तडाख्याने पक्षी जखमी होणे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार वाढत आहेत. पक्षीमित्रांसह विविध स्वयंसेवी संस्था जखमी पक्ष्यांवर तातडीने उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गात मुक्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा ४४ अशांंच्या पुढे गेला. त्यावेळी पक्षी-प्राण्यांची अक्षरश: होरपळ झाली. पाण्याच्या अभावामुळे रानावनातील पक्षी-प्राणी मनुष्यवस्तीकडे येत आहेत. शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घार, पारवा, ससाणा यासह अनेक पक्षी उन्हाच्या तडाख्याने भोवळ येऊन पडले. काही पक्ष्यांवर निसर्गप्रेमींकडून वेळीच उपचार सुरू असल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे.

बंकलगीगावात वानरांचा मुक्काम
रानात राहणारी वानरं पाण्याच्या शोधात फिरत आहेत. बंकलगी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारात गेल्या आठवड्यात एक वानर उष्माघाताने मृत्युमुखी पडले. गावकऱ्यांनी त्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. सध्या त्या गावात आठ ते दहा वानरांची टोळी मुक्कामी आहे. त्यांच्यासाठी गावकऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे. पाणी मिळत असल्याने दिवसभर रानात फिरून पाण्यासाठी ती वानरं गावात मुक्कामासाठी येत अाहेत.

दमाणी नगरातील : सुशांत कुलकर्णी यांच्या घराच्या अंगणात एक पारवा उष्माघातामुळे पडला. त्यास प्राथमिक उपचार सुरू केल्यामुळे काही वेळानंतर त्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.

शिवाजीनगर बाळे समर्थ खानावळ येथे एक चामेलीयन जातीचा सरडा उन्हाच्या तीव्रतेमुळे निपचित पडला होता. त्या सरड्याला एका बकेटमधे घेऊन थंड ठिकाणी ठेवण्यात आले होते.सरड्यालाआलुरे यांनी नेचर काॅन्झर्व्हेशनला देण्यात येणार आहे.

पूर्व भागातील पुलगम शोरूमशेजारी
असलेल्या झाडावरून एक घार पडली. एका तरुणाने नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केलचे पप्पू जमादार यांना फोनवरून कळवले. जमादार यांनी त्या ठिकाणी पोहोचून त्या घारीची पाहणी केली. ते घारीचे पिल्लू नुकतेच उडण्यासाठी बाहेर पडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यास पाणी पाजून घरट्याच्या परिसरात सोडण्यात आले.

दत्त चौक : येथे असलेल्या मनगोळी हॉस्पिटलजवळ उष्माघातामुळे एक पारवा पडला असल्याचे युवराज शेळके यांनी निसर्गप्रेमींना कळवल्यानंतर तो पारवा ताब्यात घेऊन त्यावर उपचार सुरू केले.

उन्हाच्या तडाख्यामुळे भोवळ येऊन पडलेली घार दुसऱ्या छायाचित्रात जखमी झालेला पारवा
^उन्हाच्या वाढत्यातडाख्यामुळे पक्षी-प्राणी जखमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. तहानलेल्या पाखरांसाठी प्रत्येकाने घोटभर पाण्याची सोय करण्याची गरज आहे. भोवळ येऊन पडलेला पक्षी आढळल्यास त्यास थंड वातावरणात ठेवावे अन् पाणी पाजावे, त्याच्या हालचाली वाढल्यानंतर त्यास निसर्गात मुक्त करावे. पप्पू जमादार, नेचरकॉन्झर्व्हेशन सर्कल