आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरचा उन्हाचा 'ताप' वाढला, पारा ४४.९ अंश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - तापलेल्या मध्य महाराष्ट्रात गुरुवारी सोलापूरचा पाराच उंचावर होता. हवामान खात्याने यंदाच्या हंगामातील सर्वाधिक (४४.९) तापमानाची नोंद केली आहे. मालेगाव (४४.४) दुसऱ्या क्रमांकावर तर जळगाव (४३) तिसऱ्या क्रमांकावर होते. ही दोन्ही शहरे सर्वाधिक तापमानासाठी मध्य महाराष्ट्रात परिचित आहेत. परंतु सोलापूरने त्यांना मागे टाकले आहे.

बुधवारी सायंकाळपासून उकाडा होता. गुरुवारी सूर्योदय झाल्यानंतर काही तासांतच सूर्यकिरणांचेचटके बसू लागले. दुपारी बाराच्या सुमारास त्याची तीव्रता वाढली. रस्त्यांवर तुरळक गर्दी होती. उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेये घेत होते. ज्येष्ठांची प्रचंड घालमेल सुरू होती. सावलीत थांबल्यानंतरही उष्णतेच्या झळा लागत होत्या. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर गरम वाफा येण्यास सुरुवात झाली. असह्य उन्हाळ्याने गुरुवारी सोलापूरकर त्रस्त झाले होते.

विदर्भ तापलेलाच
विदर्भात नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्याने ४५ अंशाचा पारा पार केला. चंद्रपूर (४५.६)मध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

असे तापले सोलापूर
सोमवार (ता. १८) ४२.७
मंगळवार (ता. १९) ४२.२
बुधवार (ता. २०) ४४.०
गुरुवार (ता. २१) ४४.९