आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यात अडकलेल्या दहा जणांना प्रशासनाने २४ तासांनंतर काढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण - मांजरा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पाण्यात अडकून पडलेल्या १० जणंना सुमारे २४ तासांनंतर पाण्याबोहर काढण्यात यश आले. त्यमुळे पाण्यात अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाइकांचा जीव भांड्यात पडला. हा प्रकार रविवारी दुपारी सौंदणा (अंबा) परिसरात घडला.
मांजरा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन शिवारातील एका टेकडीच्या चाहोबाजूंनी साचले होते. पाणी वाढल्यामुळे येथे १० व्यक्ती २० जनावरे अडकली होती. त्यांचा गावासोबत संपूर्ण संपर्क तुटला होता. उपविभागीय अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी घटनेची माहिती प्राप्त झाल्याबरोबर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण केले. देशमुख कुटुंबीयातील दोघांना शर्थीचे प्रयत्न करून सोमवारी (दि.३) दुपारी तीनच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.
तोपर्यंत मांजरा मायचा प्रकोप कमी होऊन पाणी काही प्रमाणात उतरल्याने त्यांना परत शिवारातील टेकडीवरील घरात रेशन साहित्यासह पाठविण्यात आले. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन दिवसांपासून दरवाजे उघडून विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे मांजरा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पायथ्याशी असणारे सौदाना (अंबा), वाकडी, लासरा, दाभा आवाड शिरपुरा या गावांलगतच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. सौंदाना (अंबा) येथील देशमुख यांचे दोन कुटुंब मागील २५ वर्षांपासून मांजरा नदीकाठच्या उंचीवरील टेकडीवर राहून परिसरात शेती करतात. रविवारी (दि.२) ७५० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यामुळे मांजरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन नदीला पूर आला. पाणी नदीपात्राबाहेर गेल्याने उंच भाग गावादरम्यानची वाट पूर्णत: पाण्याखाली गेल्याने दोन कुटुंबांतील ज्ञानोबा देशमुख, भाऊसाहेब देशमुख, व्यंकट देशमुख, रणवीर देशमुख, रणजित देशमुख, ऋषिकेश व्यंकट देशमुख, लता व्यंकट देशमुख, राजश्री रणवीर देशमुख, अनिकेत रणवीर देशमुख, यमुनाबाई सोपान देशमुख ही १० व्यक्ती २० जनावरे रविवारी दुपारपासून अडकली होती.

जीगर बाजांचा सत्कार :तेरणा नदीपात्राचे पाणी शेतात घुसल्यावर रविवारी (दि.२) लोहारा तालुक्यातील कमालपूर येथील तिवारी कुटुंबास रात्रीच्या अंधारात स्वत:च्या जीवाची पर्वा करता पोलिस महसूल प्रशासनानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुखरूप सुटका केली. या डेअरडेव्हिल अधिकाऱ्यांची दखल घेऊन आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रभारी पोिलस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलिस कर्मचारी वैजिनाथ मोहिते, नायब तहसीलदार रोहन काळे, प्रदीप ओव्हळ यांचा येथील नगरपंचायत कार्यालयात सोमवारी (दि.३) सत्कार करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार अशोक नांदलगावकर, नायब तहसीलदार एस. एस. कुलकर्णी, शिराढोण पोलिस ठाण्याचे एपीआय संजीवन मिरकले, मंडळ अधिकारी आडसुळ, तलाठी संजय तुपरपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी तळ ढोकून होते. बारवकर यांनी तत्काळ आपत्कालीन विभागाला माहिती देऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण केले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दोघांना बाहेर काढण्यात आले. कालांतराने पाणी कमी झाल्यामुळे त्या दोघांना परत टेकडीवरील घरामध्ये पाठविण्यात आले. त्यांच्यासोबत रेशन साहित्य देण्यात आले असून देशमुख कुटुंबीय सुरक्षित आहेत. त्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...