आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवारी रात्रभर जोरदार पाऊस, तेरणासह 3 प्रकल्प तुडुंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी (दि.१३) सायंकाळीपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे तेरणा व रुईभर हे मध्यमप्रकल्प तर पांढरेवाडीचा साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच खैरी नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास १० गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. जिल्ह्यात सरासरीच्या ७८ टक्के पाऊस झाला आहे.
 
उस्मानाबादेत रात्रभर पाऊस : उस्मानाबाद शहरात मंगळवारी (दि.१२) रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस बुधवारी पहाटेपर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरूच होता. तालुक्यातील तेर मंडळामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील रुईभर येथील प्रकल्प या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला. 
 
तेरणा तुडुंब भरला... 
उस्मानाबादशहरासह परिसरातील चार मोठ्या अनेक छोट्या गावांसाठी पाणीपुरवठा करणारा तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प बुधवारी (दि.१३) सकाळी ११.२० मिनिटांनी ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहिला. मंगळवारी रात्री तेर महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मंडहात ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गतवर्षीच्या तुलनेत तेरणा प्रकल्प १७ दिवस अगोदरच ओव्हलफ्लो झाला आहे. गतवर्षी ८४५ मिलीमीटर पाऊस पडून दि.३० सप्टेंबर १६ रोजी प्रकल्प भरला होता. या प्रकल्पातून उस्मानाबाद शहरासाठी दररोज २६ लाख लिटर पाणी उपसले जात आहे. धरण ओसंडून वाहत असल्याने तेर-जागजी मार्गावरील लाडजा नाल्याने पाणी आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. 
 
तेरखेडा परिसरात ४२ तर येरमाळ्यात ३८ मिलिमीटर पाऊस : येरमाळा-तेरणा नदीचे उगमस्थान असलेल्या तेरखेडा येरमाळा परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी प्रथमच तेरणा नदी भरून वाहिली. तेरखेडा परिसरात ४२ मिलीमीटर तर येरमाळा येथे ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तेरणा नदीकाठच्या रत्नापूर, पानगांव, संजीतपूर, सापनाई, बारातेवाडी, सापनाई, दहिफळ, गौर, बरमाचीवाडी, शेलगांव (दि.), शेलगा ज. आदी गावांच्या परिसरात नदीला चांगलेच पाणी आले. चोराखळी, मलकापूर तलाव ओव्हरफ्लो झाले अाहेत. 
 
बाणगंगानदीला पुरामुळे बार्शी-पाथरुड मार्ग ठप्प : भूमतालुक्यातील गणेगावसह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे उडीद मूग पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आल्याने बुधवारी सकाळी वाजेपासून ते दुपारी वाजेपर्यंत बार्शी- पाथरुड मार्गावरील वाहतूक ठप्प होती. यामुळे आंतरगाव येथे शिक्षणासाठी येणाऱ्या इडा, सावदरवाडी, पिडा, जवळा, आरणगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत येता आले नाही. 
 
उमरगा शहरात जोरदार पाऊस 
उमरगाशहर परिसरात बुधवारी सकाळी वीस मिनिटे झालेल्या पावसानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मेघ गर्जनेसह पाऊस झाला. अंतर्गत गटारी पावसाच्या पाण्यामुळे राष्ट्रीय महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.पावसाने हद्दवाढ भागातील रस्ते चिखलाने माखले होते. आणखी पावसाची शक्यता आहे. 
 
पाथरुड परिसरातील नदी-ओढे खळाळले : पाथरुड-सुरुवातीला पाथरुड परिसरात ओढ दिलेला पाऊस आता परिसरात समाधानकारक पडत असल्याने विहिरी जलमय झाल्या असून नदी-ओढे खळखळून वाहत आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. 
 
जाकेपिंपरी ते आरणगाव वाहतूक ठप्प 
परंडा तालुका परिसरात बूधवारी (दि.१३) पहाटे झालेल्या दमदार पावसाने पांढरेवाडी प्रकल्प १०० टक्के भरून ओसंडला आहे. तसेच तालुक्यातील शेळगाव येथील नदीचे पाणी पुलावरुन वाहत असल्याने जाकेपिंपरी ते आरणगाव मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन गावाचा संपर्क तुटला आहे. जवळा(नि)मंडळात तालुक्यात सर्वाधिक ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे परिसरातील नदी, नाले, ओढे खळखळले आहेत. 
 
गतवर्षी सीना-कोळेगाव प्रकल्पासह खासापुरी, साकत, खंडेश्वरवाडी, चांदणी पांढरेवाडी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. पांढरेवाडी प्रकल्प ओहर फ्लो झाल्यामुळे सीना कोळेगाव प्रकल्पासह अन्य मध्यम प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. तालुक्याची पावसाची सरासरी ६१५ मिमी असून आत्तापर्यंत ५५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी परंडा- ४०, आसु-२९, अनाळा-०५, सोनारी-१६ तर जवळा(नि) मंडळात सर्वाधिक ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. तसेच विहिरी भरल्या आहेत. 
 
दुसऱ्यावर्षीही रुईभर येथील तलाव तुडुंब 
उस्मानाबाद शहरासह, बेंबळीला पाणीपुरवठा करणारा रुईभर येथील मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्यावर्षीही पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्पावर कृषी सिंचनासाठी परिसरातील १२ गावांचा शिवार अवलंबून आहे. सोमवारी मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडवा वाहू लागला आहे. सावळा नदीतून तलावासाला सांडवा आहे. या तलावातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत आहे. 
 
धरणावरील बंदोबस्त वाढविला 
विहिरीवर बोरीच्या झाडाची फांदी टाकून मृतदेह काढण्याचा प्रयत्न सुरू होता. दुसरीकडे घटनास्थळावर पारधी समाजातील महिला मोठा आक्रोश करत होत्या. दरम्यान, या घटनेमुळे प्रकल्पावरील पोलिस बंदोबस्त आणखी वाढविण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...