उस्मानाबाद - शिवसेनासत्तेत असो अथवा सत्तेबाहेर कायम जनतेच्या प्रश्नासाठी, त्यांच्या अडचणीत मदतीसाठी कार्यरत राहिली अाहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेली ही शिकवण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा, शिवसेनेचे मंत्री येथे तुमच्या मदतीला आले आहेत. लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही येतील. शिवसेना शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी भावनिक साद राज्याचे परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी उपस्थित शेतकरी त्यांच्या कुटुंबीयांना घातली. शुक्रवारी (दि.११) उस्मानाबाद येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा तसेच हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होतेे.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव राज्यसभा खासदार अनिल देसाई, आरोग्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ज्ञानेश्वर पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुधीर पाटील, अादर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस के. टी. पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना रावते म्हणाले की, आम्ही येथे सगळे मंत्री म्हणून एकत्र असलो तरी त्याही आधी आम्ही शिवसैनिक आहोत. सरकार म्हणून आजपर्यंत कोणीच केले नाही, त्यापेक्षा जास्त सध्याचे सरकार राज्याच्या हितासाठी कार्य करत आहे. हे सरकार शंभर पावले पुढे आहे. मराठवाडा विदर्भात प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवजलक्रांती ही योजना शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असून यासाठी सर्व आमदार, खासदार आपला निधी देतील, असे सांगितले. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे १६ गरजवंत शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले.
रावतेंकडून मराठवाड्यातील आठवणींना उजाळा
यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सुरुवातीच्या काळापासून मराठवाड्याशी शिवसेनेची जुळलेली नाळ सांगताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी १९८३ मध्ये बीड जिल्ह्यातील प्लेगच्या साथीमध्ये केलेले कार्य, १९८६ मध्ये दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या छावणीसाठी केलेले प्रयत्न, १९९३ मध्ये उस्मानाबाद लातूरमध्ये भूकंपानंतर उद्ध्वस्त गावात केलेली मदत अशा अनेक गोष्टींना उजाळा देऊन, त्यावेळी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांच्या झालेल्या मदतीचा आवर्जून उल्लेख केला.
मंत्र्यांसह मराठवाड्यातील आमदारांची दांडी
शिवसेनेच्या दुष्काळी शेतकऱ्यांना मदतीच्या कार्यक्रमाची उस्मानाबाद येथून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असल्याचे नियोजित हाेते. त्याचबरोबर पर्यावरणमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे , दादासाहेब भुसे, रवींद्र वायकर, दीपक केसरकर, खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती राहणार होती. परंतु, ठाकरे यांचा दौरा रद्द होताच केवळ रावते, केसरकर, डॉ. सावंत, शिवतारे, देसाई, राठोड यांनीच हजेरी लावली. खैरे, कदम, शिंदे आदींनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

शिवसेनेचे सचिव तथा राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी शिवसेनेने विडा उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवजलक्रांती शेतकऱ्यांना मदत हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. "स्मृती' या संस्थेद्वारे शिवसेनेने मदतीचा ध्यास घेऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना कायम स्मरणात ठेवल्याचे सांगितले. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून शक्य ते केले जात आहे. याचबरोबर शिवसेनेतर्फेही धीर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
मराठवाड्याकडे शिवसेनेचे लक्ष : आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, मराठवाड्याकडे शिवसेनेचे कायम लक्ष राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचेही या भागाकडे लक्ष आहे. वाढत्या आत्महत्या चिंतेचा विषय आहे. यामुळेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. गेल्यावर्षीही टँकर, पाण्याच्या टाक्या, चारा छावण्या आदींद्वारे मदत करण्यात आली. शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलता खंबीरपणे उभे रहावे, शिवसेना तसेच सरकार आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.
जलयुक्त अंतर्गत गावांचा कोटा वाढवून द्यावा : खासदार गायकवाड
मराठवाड्यातीलदुष्काळी परिस्थिती पाहता सध्या शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील १२ ते १५ गावे निवडण्यात येत आहेत. या भागात भरीव काम दुष्काळ निवारण करायचे असेल तर बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्रत्येक वर्षी एक हजार गावांचा कोटा देण्यात यावा, जेणेकरून दोन वर्षांत त्यांना फायदा मिळेल. त्यामुळे या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची समस्या सुटण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे, अशी मागणी यावेळी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केली.