आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सम्राट चौक-कोंतम चौक रस्ते कामावर अहवालातून पांघरूण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सम्राट चौक ते कोंतम चौक या दरम्यान होत असलेल्या रस्त्याच्या कामांतील चुकांवर पांघरूण घालण्याचे काम महापालिकेचे अधिकारी करू लागले अाहेत. महापालिका अायुक्तही या विषयात गंभीर नाहीत. १.६ फूट खोल रस्ता खोदून त्यावर रस्ता करणार असल्याचे सांगणारे अधिकारी अाता अहवालातून मात्र तसे बंधन नसल्याचे सांगू लागले अाहेत. विशेष म्हणजे रस्त्याची रुंदी अॅडजेस्ट करण्याची नवी शक्कल लढवली जात अाहे. रुंदीने रस्ता लहान अाहे, तेथे पदपथ छोटा केला जाणार अाहे.

रस्ता करण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याची रुंदी समान हवी. जर समान नसेल तर भूसंपादन करणे गरजेचे असते. सम्राट चौक ते कोंतम चौक हा रस्ता तयार करताना कुठेच रुंदी मोजण्यात आली नाही. रस्त्यावरील बांधकाम, बसस्टॉप आदींना धक्का लावता रस्ता तयार केला जात आहे. यामुळे रस्त्याचा आकार नागमोडी आकाराचा होत आहे. रस्ता कमी केल्यामुळे खर्चही कमी होणार आणि यामुळे मक्तेदाराचा फायदा होणार आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी रस्त्याची रुंदी कमी होणार नाही, रस्त्याची रुंदी समान ठेवण्यासाठी फुटपाथची रुंदी कमी करू, अशी माहिती दिली. हे काम सुरुवातीलाच करणे गरजेचे होते. ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकल्यानंतर रस्ते कामाच्या अखेरच्या टप्प्यात फुटपाथची रुंदी कमी करणे म्हणजे केलेल्या रस्त्याला पुन्हा खोदणे आले. यामुळे त्याचा दर्जा कितपत टिकून राहील, हे सांगणे अवघड आहे.

रस्त्याच्या कामाबद्दल ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकल्यानंतर महापालिकेने या रस्त्याच्या तपासणीचे काम आकार अभिनव कन्सलटन्ट यांना दिले. या थर्ड पार्टीने अहवाल सादर केले. कामाचा मक्ता एस. एम. अवताडे यांना देण्यात आला. या कामाचा एकूण खर्च कोटी १९ लाख ३४ हजार २६१ रुपये आहे. यापैकी कोटी २४ लाख, ६४ हजार ३६१ रुपयांचे बिल मक्तेदारास अदा करण्यात आले आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्टअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

रस्त्याचे काम चांगले असल्याचा अहवाल
रस्त्याची पाहणी करण्याची जबाबदारी थर्ड पार्टीवर सोपवण्यात आली होती. त्यांचा अहवाल आला असून कुठेही बेकायदा, चुकीचे, निकृष्ट काम होत आहे असे सांगण्यात आले नाही. रस्त्याचे काम चांगले आहे, असा अहवाल आहे. लक्ष्मण चलवादी, नगर अभियंता

१.६ फूट खाेल खोदाई झालीच नाही
रस्तातयार करताना १.६ फूट खोल खोदून त्यामध्ये तीन प्रकारचे थर करून काम पूर्ण केले जाते. मात्र रस्ता कुठेच १.६ फूट खोल खोदण्यात आला नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी याची तपासणी एजन्सीमार्फत केली जाईल, असे उत्तर दिले होते. सध्या विचारल्यावर संपूर्ण रस्ता १.६ फूट खोल खोदून करावा, असे बंधन कुठेच नाही. आवश्यक ठिकाणी तेवढी खोदाई करावी, अशी माहिती अहवालात आल्याचे सांगितले जात आहे. जास्तीत जास्त पावणे दोन फूट आणि कमीत कमी सहा इंचापर्यंत खोल खोदाई केली जाते. मात्र, एकाच प्रकारे सर्व ठिकाणी खोदाई केली जात नाही, अशी माहिती या विभागाचे अधिकारी लोखंडे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...