आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सोलापूरचे तापमान जास्त; ३९.८ अंशांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापुरात इतर जिल्ह्यांच्या मानाने जास्तीचे तापमान असल्याने शहरवासीय हैराण झाले आहेत. हे तापमान दोन दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे रात्रीदेखील तीव्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. सोमवारी तापमान एक अंशाने कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता कमी जाणवत होती.

शनिवार रविवारी दोन दिवस तापमान ४०.७ अंशांवर होते. सोमवारी एक अंशाने कमी होऊन तापमान ३९.८ अंशावर आहे. जरी कमी झाले तरी तापमान वाढण्याची शक्यता आहे, असे पुणे हवामान विभागाने सांगितले. दुपारच्यावेळी उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठेत गर्दी कमी दिसत होती. नागपूर, चंद्रपूर या भागात जास्तीचे तापमान असते. परंतु सोलापूरने अति उष्णता असलेल्या जिल्ह्यांना मागे टाकले. मार्चमध्ये सोलापुरात ४०.७ अंश सेल्सिअसवर तापमान गेले आहे. त्यामुळे नागरिक बाहेर पडायला धजत नाहीत. वाढलेल्या तापमानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. शरीराचे तापमान वाढल्याने नागरिकांचा शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी थंड पेय पिण्यासाठी जास्त ओढा आहे.

भरपूर पाणी पीत राहा
आपल्याशरीराचेही तापमान कमी होते. घाम येणे बंद झाले तर हीट स्ट्रोकचा धोका वाढू लागतो. काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. यासाठी फळांचे सरबत, नारळपाणी, भाज्यांचे सूप याचे आहारातील प्रमाण वाढवावे. दररोज ते लिटर पाणी प्यावे. उन्हाळ्यात भूक पचन क्षमता दोन्ही मंदावलेल्या असतात. त्यामुळे पचण्यास जड असलेले मांसाहार, उडीद, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. कोकम, लिंबू सरबत, डाळिंबाचा रस, फळामध्ये संत्री, मोसंबी यांचा वापर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी करावा.

यंदा सोलापूरला जास्त तापमान आहे. हे तापमान वाढून ते आणखीन ते अंशांनी वाढेल. त्यामुळे महिनाभरात तापमान वाढण्याची शक्यता आहे. पाऊस लवकर सुरू होईल, अशा अंदाज सांगता येणार नाही.” सुनीता देवी, संचालक,पुणे हवामान
सोलापुरात तापमान जास्त आहे. त्यामुळे शरीराला चिटकून राहणारे कपडे परिधान करू नये, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. जास्त पाणी प्यावे. चहा, कॉपी मद्य टाळलेले बरे. उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा. उन्हाचा तीव्रतेने चक्कर येण्याची शक्यता असते. जास्तीच्या उन्हामुळे तापमान वाढून शरीरावर परिणाम होतो. डॉ. शिरीष वळसंगकर, मेंदूरोग तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...