आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्च शिक्षित तरुणी झोपडपट्टीत जाऊन करतेय शिक्षणाचा प्रसार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर  : हाती पैसा नाही. फिरण्यासाठी वाहन नाही. ती पायपीट करत वाड्या वस्त्यांवर जाते. ज्यांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही अशांना शिकवते. मित्रमैत्रिणींच्या सहकार्याने अनेकांना गणवेश, वह्या पुस्तके, पाटी पेन्सिल आदी मदत करते. गेल्या दोन वर्षांपासून आपल्या प्रेरणा या संस्थेच्या माध्यमातून कृतिशील प्रयत्न करत आहे. ती आहे प्रमिला उबाळे.
 
शेळगी येथील सामान्य कुटुंबातील ही कन्या. शिक्षण एमएबीएड. घरची गरिबी. पण समाजातील अनेकांना भेटून त्यांच्याकडून वस्तू आणि रकमेच्या रूपात मदत घेते. महिलांशी गप्पा अन् त्यातून प्रबोधन, आरोग्य शिबिर, मुलांसाठी व्याख्यान, उत्सवांचे आयोजन असे अनेक मार्ग ती चोखाळते. 
शेळगी, बाळे, केगाव आणि वैदू वस्त्यांवर जाऊन तेथील मुलामुलींना शिक्षण देते. कधी कधी धाय मोकलून रडावे असे प्रसंग समोर येतात. असे बिकट क्षणच कणखर बनवण्याची संधी घेऊन येतात, असे प्रमिला सांगते. 
 
करू शकता मदत 
जुनी पुस्तके, मुबलक वह्या आणि शाळेचे बूट, कंपास यासारख्या वस्तू आणि गणवेश मदत रूपाने देऊ शकता. अगदी ५० रुपयांपासूनही मदत करू शकता.

 संपर्क -९८८१३९९८६१. मीनगरच्या स्नेहालयात काम करत होते. तेव्हा मला प्रचंड शिकायला मिळाले. आम्ही पाच बहिणी. तिघींची लग्ने झाली तेव्हा घरी कुणी नसल्याने मला पुन्हा सोलापुरात यावे लागले. मात्र येताना मी एक नवे स्वप्न घेऊन आले, जे सत्यात आणतेय. 
प्रमिला उबाळे 
-ताई सगळ्यांना खूप मदत करते. आम्हाला कपडे, पुस्तके आणि काही कमी पडत असेल तर ती त्या वस्तू आणून देण्याचा प्रयत्न करते. 
नंदिनी शिवराल, वैदू वस्ती, शेळगी 
 
-ताई आमच्याकडे रोज येते. आम्हाला शाळेचे, अभ्यासाचे महत्त्व सांगते. मी आधी शाळेला जात नव्हतो पण आता मी आवडीने जातो. 
कटप्पा शिवरे, शेळगी झोपडपट्टी 
 
बातम्या आणखी आहेत...