आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोहल्ला अस्सी, रईस चित्रपट प्रदर्शित करू नका’ , ‘हिंदू जनजागृती’ची चित्रपटगृह चालकांकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जानेवारी महिन्यात मोहल्ला अस्सी आणि रईस हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी मोहल्ला अस्सी या चित्रपटात हिंदूंच्या धर्मश्रद्धांवर टीका करण्यात आली आहे. तर रईस चित्रपटात पाकिस्तानी कलाकारांनी भूमिका साकारली आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित करू नयेत, अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समितीने येथील बिग सिनेमाचे व्यवस्थापक सुशांत सुरवसे यांना दिले. 

या वेळी माजी नगरसेवक बापू ढगे, नितीन घनाते, बन्सीकुमार जितुरी, रोहन क्षीरसागर, नयन गट्टी, अमर ढगे, संदीप ढगे, राजेश बसुदे, रोहन होळकर, समितीच्या वतीने सोलापूर जिल्हा समन्वयक राजन बुणगे, हिरालाल तिवारी, अलका व्हनमारे, अनिता बुणगे, विनोद रसाळ उपस्थित होते. तसेच या वेळी प्रभात, उमा, स्क्वेअर आणि लक्ष्मीनारायण या चित्रपटगृहचालकांनाही निवेदन देण्यात आले. निवेदनास चित्रपटगृहचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समितीने सांगितले.
 
२५ जानेवारी २०१७ ला माहिरा खान या पाकिस्तानी अभिनेत्रीची मुख्य भूमिका असलेला रईस चित्रपट प्रदर्शित होत आहे. उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानच्या विरोधात जनभावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे रईस आणि मोहल्ला अस्सी या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी समितीने शासनाकडे केली आहे. चित्रपटगृहांनीही प्रदर्शित करण्यास नकार देऊन राष्ट्र आणि धर्म कार्यात वाटा उचलावा, अशी समितीची मागणी आहे.