आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हय्याकुमारच्या सभेला हिंदू महासभेने केला विरोध; महापालिका, पोलिसांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी नेता कन्हय्याकुमार यांच्या सोलापुरातील सभेला अखिल भारत हिंदू महासभेने विरोध केला आहे. साेलापूर महापालिका अायुक्त आणि पोलिस आयुक्तांना त्याची निवेदने दिली. त्यात म्हटले आहे की, या सभेमुळे सामाजिक शांतता भंग होईल.
 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही सभा अायोजित केली. नोव्हेंबरला शांती चौकातील पुंजाल क्रीडा मैदानावर सायंकाळी साडेसहाला ही सभा होत अाहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने निवेदन काढले. कन्हय्याकुमारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी अतिरेकी कृत्याचे समर्थन केले. अफजल गुरूच्या फाशीचा स्मृतिदिन साजरा केला. अशा व्यक्तीच्या या सभेला परवानगीच देऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे.
 
महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही निवेदने दिली. त्यांच्या समवेत हिंद जनजागृती समितीचे यशपाल वाडकर, विनोद रसाळ, महासभेचे सदस्य विजय यादव, मल्लिनाथ पाटील, किरण पंगुडवाले, अप्पू कणके, अभय कुलथे, अविनाश हजारे, शुभम साठे, मोहन कन्ना, विश्वजित दुर्लेकर, चंद्रकांत जक्कन, अक्षय अंजिखाने, प्रमोद सलगर, विजय कोळी आदी उपस्थित होते.
 
सभा होणारच
वर्तमान स्थिती आणि व्यवस्थेच्या विरोधात कन्हय्या उभा राहिलेला आहे. दिल्लीतल्या घटनेनंतर त्यांच्या देशभरात सभा झाल्या. कुठेही वादग्रस्त विधान नाही. त्यावरून गुन्हा दाखल नाही. लोकशाही मार्गानेच त्याच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर साेलापुरातील सभाही होणारच. त्याला कोणीच रोखू शकणार नाही. अॅड.एम. एच. शेख, माकप नेते
बातम्या आणखी आहेत...