आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा वाहनांच्या धडकेत मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदर- पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनांची धडक लागून जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास करमाळा एमआयडीसी नजीक असलेल्या बागल पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. वनपरिक्षेत्र अधिकारी बापू येळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रस्ता ओलांडत असताना वाहनाची धडक लागून हरणाचा मृत्यू झाला. हा शिकारीचा प्रकार नसल्याचे येळे यांनी सांगितले. 

सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून नागरिकांसहित पशु पक्ष्यांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पाणी मिळत नसल्याने वन्यजीवांची वणवण सुरू आहे. पाण्याच्या शोधात ते रस्त्यावर येतात आणि अशा प्रकारे अपघातात त्यांचा मृत्यू होता. त्यामुळे वन विभागाच्या वतीने पशू पक्ष्यांसाठी पशू प्राण्यांचा वावर असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृत्रिम पाणवठे सुरू करण्याची गरज आहे. काही ठिकाणी पाणवटे आहेत. या पाणवठ्यात दररोज पाणी सोडले जात नाही. पाण्यासाठी भटकणाऱ्या प्राण्यांना अपघाताबरोबरच शिकारीचा धोका वाढला आहे. 
बातम्या आणखी आहेत...