आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरकणी कक्ष स्थापनेचे आदेश कागदावरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा टक्का वाढत आहे. परंतु, कार्यालयांमधील वातावरण आणि सुविधा महिलांसाठी पूरक अशा नाहीत. विशेषत: सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातेला स्तनपान करण्यासाठी ६० बाय ६० ची स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, असे धोरण शासनाने २०१२ मध्ये आखले. २०१४ मध्ये महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर भर देत या आदेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे आदेश पुन्हा दिले. परंतु, या आदेशाची म्हणावी तशी अंमलबजावणी झालीच नसल्याचे पुढे आले आहे.
एसटी महामंडळाने राज्यातील सर्वच एसटी स्थानकांवर हिरकणी कक्ष उभे केले आहेत. इतरत्र मात्र या संकल्पनेकडे दुर्लक्ष करण्यात आलेचे दिसून येते. केवळ एसटी महामंडळ सोडले तर सोलापुरातील अनेक कार्यालये, वर्दळीच्या ठिकाणी या संकल्पनेला महत्त्व देण्यात येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या स्तनदा मातांना आणि कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. खुद्द जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेत "हिरकणी कक्ष' सुविधा नसल्याचे पुढे आले आहे.

काय आहे परिपत्रकामध्ये?
स्तनदामाता आणि बाळांचे आजार यावर मात करण्यासाठी भारतीय स्तनपान प्रसारक मंडळाने हिरकणी कक्ष ही संकल्पना पुढे आणली. त्यानंतर सरकारने आरोग्य विभागाच्या राज्य कुटंुब कल्याण कार्यालय पुणे यांच्या माध्यमातून यासंबंधात परिपत्रक काढले. त्यानुसार हिरकणी कक्ष कसा असावा, त्याची ठेवण कशी व्हावी, त्या खोलीत काय असावे याबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रकात आहेत. वर्दळीच्या ठिकाणी अभ्यागत स्तनदा मातांना ही सुविधा देण्याची तरतूद परिपत्रकामध्ये केली आहे. परंतु, दुर्दैवाने याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.

जाणीव जागृती कमी
हिरकणी कक्ष या योजनेच्या संदर्भात योग्य जाहिरात आणि प्रत्येक कार्यालयाच्या प्रमुखांना वेळच्या वेळी सूचना करण्यात आल्या असत्या तर या योजनेचा अधिक प्रसार होऊन लाभ होऊ शकला असता. मात्र तसे झाले नाही. एवढेच नाही तर अनेक अधिकाऱ्यांना हिरकणी कक्ष म्हणजे काय याचीच माहिती नाही. ज्यांना याबाबत माहिती आहे ती अधिकारी मंडळी याकडे उदासनीतेने पाहाते.

एसटी महामंडळाने घेतली प्रेरणा : दीपककपूर या कर्तबगार अधिकाऱ्याने आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रातील 248 बसस्थानकांमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना केली त्यामुळे खऱ्या अर्थाने हिरकणी कक्षाची ओळख जनमानसात रुजू शकली.

सोलापूरच्या ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र हिरकणी कक्ष आहे. सामान्य रुग्ण महिला या दवाखान्यांमध्ये येतात, त्यावेळी स्तनपान करताना त्यांची कुचंबणा होत नाही.

असा कक्षाचा फायदा
आईनेबाळाला कामाच्या ठिकाणी घेऊन येणे किंवा कार्यालयात पाळणाघर असणे, या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. अशा वेळी हिरकणी कक्षाचा आधार मिळू शकतो. हिरकणी कक्ष असेल तर तेथे बसून माता बाटलीत दूध साठवून घरी गेल्यावर बाळाला पाजू शकतील. हिरकणी कक्षाची सुविधा सर्वत्र सहज उपलब्ध झाल्यास मातांना त्याचा फायदा होऊ शकतो.

आदेशाचे पालन करू
^जे आदेश आहेत त्याप्रमाणे हिरकणी कक्ष उभारण्याचे काम लवकरच सुरू करू. महिलांच्या विकासाचा विषय असल्याने काहीही टाळाटाळ केली जाणार नाही. धर्मपालशाहु, महिलाबाल विकास अधिकारी, सोलापूर

लवकरच सुरू करणार
^जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागात जागा नसल्याने हिकरणी कक्षाचे काम राहिले आहे. ते आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच सुरू करू. सुनीलभडकुंबे, आरोग्यअधिकारी जिल्हा परिषद

मनपात नाही कक्ष
^हिरकणीकक्ष महापालिकेत नाही. शिवाय तशा प्रकारचे आदेश असल्याचेही मला माहीत नाही. यावर रितसर चौकशी करून सांगतो. श्रीकांत म्याकलवार, मनपाउपायुक्त

सरकारी आदेशाचे पालन केलेच पाहिजे
^सरकारी कार्यालयात हिरकणी कक्ष तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही जिल्ह्यात याची अंमलबजावणी झाली नसेल तर त्यांच्यावर शो कॉजची नोटीस देऊन पुढील कारवाई करण्यात येईल. पंकजामुंडे, महिलाबालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य

पंकजा मुंडेनी केली पुन्हा सुरुवात
मंत्रालयात काम करणारी एक महिला कर्मचारी घरी बाळाला सोडून यायची. तिचे पती आणि आई बाळाला घेऊन मंत्रालयाबाहेर ठराविक वेळी वाट बघत थांबायचे. सुटीच्या वेळेत ती कर्मचारी बाहेर येऊन बाळाला स्तनपान करायची आणि परत ड्युटीवर जायची. एका वृत्तवाहिनीने संबंधित महिले कुचंबना पाहिली. त्यासंदर्भात बातमी बनवली आणि ती प्रसिद्ध करण्यात आली. महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी त्याची दखल घेतली. मंत्रालयासह राज्यातील सर्व मोठ्या शासकीय कार्यालयांमध्ये महिला कर्मचारी आपल्या बाळांना स्तनपान करू शकतील यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले.

इथे नाहीत हिरकणी कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय, महानागरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, महावितरण, ग्राहक मंच, जिल्हा कोषागार कार्यालय, मनपा आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग या ठिकाणी हिरकणी कक्ष नाहीत. अनेक निमशासकीय आणि शासकीय कायार्यालयांमध्ये ही सुविधा नाही.

आपल्या बाळासाठी प्रचंड साहस करणाऱ्या हिरकणी या शिवकालीन महिलेपासून प्रेरणा घेऊन हिरकणी कक्ष असे नाव देण्यात आले आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणी गवळण राहत होती. रायगडावर दूध पोहोचवण्यासाठी बाळाला घरी ठेवून तेथे गेली होती. मात्र, उशीर झाला. गडाचे दरवाजे बंद झाले. हिरकणीने धीर सोडला नाही. सर्व अडचणींवर मात करत बाळाला स्तनपान करण्यासाठी रात्रीच्या अंधारात उभा कडा हिमतीने उतरून ती घरी आली. अशाच प्रकारे करिअर बालसंगोपन यामध्ये समन्वय साधण्यासाठी तारेवरची कसरत करणाऱ्या जगभरातील महिलांना हिरकणी ही त्यांची प्रतिनिधी वाटू लागली. म्हणूनच स्तनदा मातांसाठी असलेल्या कक्षाला हिरकणी कक्ष असे नाव देण्याची संकल्पना पुढे आली.


बातम्या आणखी आहेत...