आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्ही संसर्गितांची होते फरपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरासह जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांच्या मोफत उपचार आणि शासकीय लाभ योजना अशा दोन्ही पातळीवर फरपट होत असल्याचे चित्र दिसते. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेच्या (नॅको : नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ) नियंत्रणात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील तीन एआरटी सेंटर आणि सात लिंक एआरटी सेंटरमधून संसर्गितांना मोफत उपचार दिले जातात.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडे पाठपुरावा, अनुदानित अशासकीय सेवाभावी संस्थांशी सिव्हिल सर्जन यांच्याशी समन्वय ठेऊन उपचार आणि योजनांबाबत प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांची आहे, मात्र त्यांनाच आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याचे दिसते. आजवर किती रुग्णांना कोणत्या योजनांचा लाभ झाला, किती प्रस्ताव प्रलंबित आहेत, याची आकडेवारी त्यांच्या कार्यालयाकडे उपलब्ध नाही
या सर्व शासकीय लाभासाठी सिव्हिल सर्जन यांचे दुर्धर आजार असल्याचे प्रमाणपत्र पुरेशे आहे. एआरटी सेंटरच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या शिफारशीनंतर एचआयव्ही संसर्गिताला सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र मिळते. १४ जानेवारी २००४ रोजीच्या शासन निर्णयानुसार संसर्गितांना सिव्हिल सर्जनच्या प्रमाणपत्रासाठी आरोग्य विभागास आदेश निर्गमित झाले.

राज्यस्तरावर एकाच नमुन्यात सिव्हिल सर्जनची एकच सही असलेले प्रमाणपत्र मिळते, मात्र यात गैरप्रकार घडू नयेत म्हणून तिघांच्या सह्यांचे प्रमाणपत्र हवे, अशा आग्रहाचा जावईशोध महसूल प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे ‘त्रास नको पण होणारा मानसिक त्रास आवर !’ अशी अवस्था एचआयव्ही संसर्गितांची झाली आहे. प्रमाणपत्रासोबत एआरटी सेंटरच्या पेशंट कार्डची सत्यप्रत ही सत्यता पडताळणीसाठी पुरेशी आहे. त्यावर पत्ता, उपचार आणि नोंदणी क्रमांक असतो. सिडी-४ तपासणी यंत्रणा नियमित चालू राहावी, बंद असल्यास अकारण हेलपाटे सोसावे लागतात. अशी रुग्णांची ओरड असते.

एचआयव्ही संसर्गीतांना रक्त तपासण्यानंतर पांढऱ्या पेशींचे प्रमाण पाहण्यासाठी निष्पन्न रुग्णांची सीडी-४ टेस्ट होते. जर ३५० च्या खाली आले तर एआरटी गोळ्या सुरू करतात. पूर्वी महिन्याच्या गोळ्या नियमित मिळायच्या. आता आठवड्यांसाठी दिल्या जात असल्यामुळे रूणांना महिन्यातून दोनदा हेलपाटे मारावे लागतात. एआरटी गोळ्या, योजनांबाबत रूग्णांची इच्छा असूनही आजार ऊघड होइल या भीतीने कोणी लेखी तक्रार करीत नाहीत, त्याचा गैरफायदा संबंधित घेतात असे सर्वत्र दिसते.

तुटवड्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची हेळसांड
आपल्या राहत्या घरापासून एचआयव्ही संसर्गितांना जवळ उपचार मिळावेत, या उद्देशाने भौगोलिक आणि रुग्ण संख्येचा विचार करून लक्षात घेऊन सोलापूरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल, बार्शी ग्रामीण रुग्णालय पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात एआरटी (अँटी रिट्रोव्हायरल थेरेपी) सेंटर कार्यान्वित आहेत. शिवाय सांगोला, करमाळा, अक्कलकोट, मंद्रूप, अकलूज, करमाळा आणि कुर्डुवाडी अशा सात ठिकाणी लिंक एआरटी सेंटर आहेत. याही ठिकाणी एचआयव्ही संसर्गित रुग्णांसाठी उपचाची सोय आहे.

गोळ्या, एचआयव्ही टेस्टिंग कीटचा तुटवडा
रुग्णांचीआधी सीडी-४ टेस्ट केली जाते. त्यात पांढऱ्या पेशींचे प्रमाण ३५० च्या खाली आढळले, तर त्याना समुपदेशनानंतर एआरटी गोळ्या सुरू करतो. सीडी-४ टेस्ट दर महिन्याला करून या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. त्या गोळ्यांचाही परिणाम होत नसेल तर ससून (पुणे) किंवा जे.जे. हॉस्पिटलमध्ये (मुंबई) सेकंड लाइन उपचार प्रणाली उपलब्ध करून देतो. डॉ.अग्रजा वरेरकर, सीएमओ-सिव्हिल

सर्वांना सूचना देणार
तीनसह्यांचे सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र कशासाठी मागितले जात आहे, याची माहिती घेऊ. संसर्गिताना अकारण त्रास होणार नाही याबाबत सिव्हिल सर्जन यांच्यासह सर्व संबंधितांना सक्त सूचना देणार आहे. उपचाराच्या पातळीवर आणि योजनांचा लाभ मिळवण्याच्या पातळीवर शासकीय कार्यालयात किंवा हॉस्पिटलमध्ये कोणताही त्रास होणार नाही, यासाठी बैठकीत तहसीलदारांना सूचना देऊ. तुकाराममुंढे, जिल्हाधिकारी, सोलापूर

गोळ्यांसाठी नॅकोकडे पाठपुरावा सुरू आहे
एआरटीगोळ्यांचा तुटवटा असला तरी पुरवठ्याशिवाय पर्याय नाही. लगतच्या जिल्ह्या-राज्यातून व्यवस्था करतो. सोलापुरातून गोळ्यांची मागणी आल्यानंतर नॅकोकडे पाठपुरावा केला आहे. अलीकडे एआरटी गोळ्यांचा तुटवडा असल्यामुळे नॅकोकडून पुरवठ्यास विलंब होत आहे, पण पाठपुरावा सुरू आहे. डॉ.पी. बी. भोई, अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई

गोळ्यांचा तुटवडा
एआरटीगोळ्यांचा तुटवडा आहे. एचआयव्ही टेस्टिंग कीटचा तुटवडाही असतो. रुग्णांसाठी वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजना आहेत. त्यासाठी सिव्हिल सर्जनच्या एकाच सहीचे प्रमाणपत्र पुरेसे आहे. महसूल विभागाकडून मात्र तिघांच्या सह्यांचे प्रमाणपत्र मागितले जात आहे. सीडी-४ मशीन आता चालू आहे. लाभार्थी रूग्णांची संख्या एनजीओंकडून घेतो. भगवानभुसारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी
दक्षता घेतली जाईल

प्रमाणपत्रावरफक्त सिव्हिल सर्जनची सही असते. मात्र, कोण तीन सह्यांचे प्रमाणपत्र मागत असतील तर ते चुकीचे आहे. कारण, प्रमाणपत्राचा नमुना राज्यस्तरावर एकच असतो. एआरटी गोळ्या, एचआयव्ही टेस्टिंग कीटच्या तुटवड्याबाबत सीडी-४ मशीन बंद राहणार नाही, याची दक्षता घेऊ. अजून एक मशीन मंजूर झाली आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडे पाठपुरावा करू. डॉ.एम. आर. पट्टणशेट्टी, सिव्हिल सर्जन

जिल्ह्यातील सर्व एचआयव्ही रुग्णांची सीडी-४ चाचणी सिव्हिलमधील एकमेव मशीनवर.
योजनांच्या लाभासाठी वाढताहेत अडचणी

महिला आणि बालकल्याण योजनेंतर्गत एक हजार रुपयांची मदत. इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुलाची तरतूद. संजय गांधी दुर्धर आजार योजनेंतर्गत दरमहा सहाशे रुपये मदत. अंत्योदय योजना. उपचाराच्या ठिकाणी ये-जा रेल्वे, एसटी प्रवासात सवलत. या शासकीय सवलती आहेत.
बातम्या आणखी आहेत...