आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर विद्यापिठाच्या प्रवेशद्वारास लावले होळकर विद्यापीठाचे बॅनर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची मागणी करत यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर नामफलक लावले. 

युवा जिल्हाध्यक्ष शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले प्रतिकात्मक नामांतर करून पिवळा झेंडा फडकवण्यात आला. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोमवारपर्यंत नाही दिले तर उग्र आंदोलन करू, असा इशारा दिला. 

विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचा तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात सेनेचे शहराध्यक्ष शरनू हांडे, उमेशभाऊ काळे, शिवानंद काळतांडे, संतोष मळगे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यास तत्त्वतः मान्यता देऊन सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीला ठरावासाठी निर्देश दिले होते. विद्यापीठ व्यवस्थापन समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देता येणार नाही, असा अहवाल पाठवला. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना हा प्रस्ताव वाचून विद्यापीठ नामांतराला विरोधच दर्शवला, असे संघटनेचे म्हणणे आहे. सेनेचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ लांडे यांच्यासमवेत शिष्टमंडळाने तावडेंची भेट घेतली पाठपुरावा केला. व्यवस्थापन समितीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचे सांगण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...