आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्याचा विचार कशाला, जे हवे त्याची आजच गुंतवणूक करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘आज जरी सर्वत्र मंदीचे वातावरण असले तरीही काही वस्तू अशा असतात की, त्या घ्याव्याच लागतात. स्वत:च घर असावं असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या प्रदर्शनातून सोलापूरकरांना आपले घर निवडण्याची संधी मिळणार आहे. भारतीय समाजमनाची अशी धारणा आहे की, आज महाग वाटणाऱ्या वस्तूंच्या किमती पुढील काळात घटतील. त्यावेळी त्याचा विचार करू. पण योग्य गुंतवणूक ही आजच करावी. उद्याचा विचार कशाला? जे आज हवे आहे, त्याची आजच गुंतवणूक करा’, असा विचार पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी मांडला.
होम मैदान येथे ‘दिव्य मराठी’ अाणि अारएनए इव्हेंट्सतर्फे भार्गवी ग्रुप प्रस्तूत गृह अाणि वाहन प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवारी सकाळी झाले. त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. पालकमंत्री िवजयकुमार देशमुख प्रमुख पाहुणे होते. या वेळी मंचावर ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक संजीव पिंपरकर, भार्गवी ग्रुपचे अमोल यादव, क्रेडाईचे अध्यक्ष समीर गांधी, राज्याचे सहसचिव राजेश गांधी, एसएडीए अध्यक्ष पृथ्वीराज गांधी आदी होते.

श्री. सेनगावकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारनेही आठवडी बाजारची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. गृह वाहन प्रदर्शनातून सोलापूरकरांना एकाच छताखाली गृह वाहनांसंबंधी आवश्यक असणारी माहिती मिळणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमांची आज शहराला गरज आहे.

श्री. देशमुख म्हणाले की, सर्वत्र मंदी असल्याने व्यावसायिक व्यापारी अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोलापुरात नवे नवे गृह प्रकल्प साकार होत आहेत. याची नागरिकांना फारशी माहिती नाही. अशा प्रदर्शनांमुळे नागरिकांना योग्य ती माहिती एकाच छताखाली मिळण्यास मदत होते. सध्या मंदीमुळे घरांच्या किमती कमी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी गृह प्रकल्प हा चांगला पर्याय आहे.”

समीर गांधी म्हणाले , प्रदर्शनाची ही चांगली सुरुवात आहे. सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने व्यवसायासाठी वातावरण चांगले आहे. गृह प्रकल्पांसाठी जरी मंदी असली तरीही अाॅटो क्षेत्राला चांगले दिवस आहेत. या प्रदर्शनाचा सोलापूरकरांनी लाभ घ्यावा.

श्री. यादव म्हणाले की, एकाच छताखाली सोलापूरकरांना घराचे चांगले लोकेशन कुठे आहे ते कळते. चांगले बिल्डर्स, प्रॉपर्टी या विषयाची सविस्तर माहिती मिळण्यास मदत होते. अाॅटो क्षेत्रातही नामवंत कंपन्यांची वाहने उपलब्ध आहेत.

प्रॉपर्टी-ऑटो एक्सपो-१६च्या दालनांची पाहणी करताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, भार्गवी ग्रुपचे अमोल यादव, क्रेडाईचे अध्यक्ष समीर गांधी, राज्याचे सहसचिव राजेश गांधी, एसएडीए अध्यक्ष पृथ्वीराज गांधी आदी.

होम मैदानावर भरलेले सोलापूरकरांना हे प्रदर्शन सोमवारपर्यंत सकाळी ११ ते रात्री दरम्यान पाहता येईल. प्रदर्शन सर्वासाठी खुले असणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध नामवंत कंपन्यांची वाहने पाहण्यासाठी अाणि खरेदीसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात अाली अाहेत. एकूण ४४ दालने आहेत.
बातम्या आणखी आहेत...