आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील संगीताच्या उपासकांचा झाला गौरव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - संगीत क्षेत्रात आपली हयात घालविणाऱ्या बुजुर्ग कलावंत आणि नव्या या क्षेत्रात येणाऱ्या उदयोन्मुख युवा गायकांचा संगीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.अब्दुल सत्तार म्युझिकल अॅण्ड कल्चरल अकॅडमी, सोलापूर फिल्म इन्स्टिट्यूट आणि शाहीर रामहरी सिद्राम भोसले-पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हिराचंद नेमचंद वाचनालयातील अॅम्फी थिएटर येथे हा कार्यक्रम पार पडला.
हिंदी चित्रपटातील विनोदी अभिनेते मुश्ताक खान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर एजाज अहमद शेख, गायक गिरीश पंचवाडकर, मोहम्मद अय्याज आदी उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर स्टार्स ऑफ मेलडीच्या वतीने बहारदार नृत्य -गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. संगीत पुरस्कार वितरणप्रसंगी यासिन सय्यद, भालचंद्र पंचवाडकर, मुश्ताक खान, मोहम्मद अय्याज, मुन्वर पीरभाई, एजाज कारीगर आदी.
जुन्या आठवणींना उजाळा
यावेळीसय्यद यांनी जाने बहार तेरा हुस्न, ये महल, ये दोैलत, याद आऐ बिते दिनो की अशी सुमधुर गीते सादर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर भालचंद्र पंचवाडकर यांचे चिरंजीव गिरीश पंचवाडकर यांनी सीमा या चित्रपटातील तू प्यार का सागर है हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. स्टार्स ऑफ मेलडीचे जब्बार मुर्शद कलावंतांनी बहारदार गीते सादर केली. मंजूषा गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
यांचा झाला गौरव
या वेळीयासीन सय्यद यांना जीवन गौरव, तर संगीत शिक्षक भालचंद्र पंचावडकर, अशोक सुरतगावकर, युवा गायक मोहम्मद अय्याज, स्व. रामप्रसाद दुबे, मुन्वर पीरभाई, एजाज नबी कारीगर यांना संगीत पुरस्काराने गौरव केला.
संगीत ही उपासना
संगीत ही उपासना आहे. संगीत ऐकल्यानंतर सर्व ताण नाहीसा होतो. या कलेचा आनंद सर्वच जण घेतात. संगीत क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांनी मनापासून साधना करून ही कला आत्मसात करावी, असे प्रतिपादन मुश्ताक खान यांनी केले. यावेळी खान यांनी वेलकम चित्रपटातील काही संवाद सादर केले. त्याला रसिकांची दाद मिळाली.