आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅटेलमधून बॅग चोरणारा एलसीबी पथकाच्या जाळ्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; लाॅजमध्येकाॅटप्रमाणे भाड्याने राहून बॅग लंपास करणाऱ्या चाेरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साेमवारी रात्री ८.३० वाजता रेल्वे स्थानक परिसरातील गुरुकृपा लाॅजमधून ताब्यात घेतले.
रेल्वेस्थानक परिसरातील अाराम गेस्ट हाऊसमधून २७ अाॅगस्टला एका चोरट्याने अजितकुमार राजेंद्रप्रसाद माैर्य (वय २१, रा. उत्तर प्रदेश, ह.मु.पुणे) यांच्या मालकीचे लॅपटाॅप, माेबाइल असा ३३ हजार ३०० रुपयांचा एेवज लंपास केला हाेता. हा चाेरटा लाॅजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला हाेता. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. अाराम गेस्ट हाऊसमध्ये अजितकुमार यांनी भाड्याने खाेली घेतली हाेती. त्याच खाेलीतील दुसरा काॅट राहुल एस. साेनवणे (वय ३१, रा.सातपूर, नाशिक) याला भाड्याने िदला होता.

राहुलने मतदान अाेळखपत्र दाखवून खाेली भाड्याने घेतली हाेती. दुसऱ्या िदवशी अजितकुमार अंघाेळीसाठी बाथरुममध्ये गेला असता, खाेलीतील त्यांचे लॅपटाॅप, माेबाइल, माेडेम, पेन ड्राइव्ह असा एकूण ३३ हजार ३०० रुपयांच्या ऐवज घेऊन राहुल पसार झाला हाेता.
गुरुकृपालाॅजमधून अटक
लाॅजमधूनबॅग लांबवणारा चाेरटा गुरूकृपा लाॅजमध्ये अाल्याची माहिती एलसीबीचे िनरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळाली हाेती. त्यावरून त्यांनी भास्कर पाटील, िवनाेद चाैधरी, संजय पाटील, िमलिंद साेनवणे, सतीश हाडनाेर यांना चाेरट्याला ताब्यात घेण्यासाठी साेमवारी रात्री वाजेला पाठवले. चाेरटा बाहेर गेलेला असल्याने पथकाने अर्धातास त्यांची वाट पाहिली. ताे अाल्यानंतर त्याला गुरूकृपा लाॅजच्या खाेलीतून नीलेश नामदेवराव धर्माळे (वय ३०, रा. बाेरगाव धर्माळे, िज. अमरावती) याला अटक केली.

चाेरट्याकडून जप्त केलेेले पाच माेबाइल एक लॅपटाॅप.
नीलेश धर्माळे याला एलसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर त्याची झडती घेतली. त्या वेळी त्याच्याजवळ एक बनावट मतदान अाेळखपत्र पथकाला सापडले. ते राहुल शिवाजी साेनवणे (रा.शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) असे हाेते. या अाेळखपत्राच्या अाधारेच ताे लाॅजमध्ये राहत हाेता. त्याने नाशिक, पुणे, अाैरंगाबाद, सुरत येथेही गुन्हे केल्याची कबुली िदली अाहे. त्याकडून पाच माेबाइल लॅपटाॅप हस्तगत केला अाहे.