आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे १५ हजार ‘पॉस’ची मागणी, जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी दिली माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कॅशलेश व्यवहार करण्यासाठी शहर-जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक कारखानदार यांनी १५ हजार पॉसची (पॉइंट ऑफ सेल) मागणी केल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली. बँकांकडूनही मागणीनुसार पॉस उपलब्ध केले जात असून मागणी केलेले मशीन्स लवकरच उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.

नोटाबंदीनंतर व्यवहारामध्ये चलन तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र राज्य शासनाने कॅशलेसचा वापर करावा, असे आदेश दिले आहे.

कॅशलेससाठी पर्यायांचा वापर कसा करावा? याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचारी, बँक अधिकारी यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे. मागणी येत आहे, त्याप्रमाणे स्वाइप मशीन उपलब्ध केले जात आहेत. रिझर्व्ह बँकेकडून चलन कधी उपलब्ध होणार? यावर जिल्हाधिकारी यांनी आज होईल, उद्या होणार हेच उत्तर मिळत आहे. रक्कम कधी उपलब्ध होईल, याबाबत बँक अधिकारी साशंकित आहेत.
एटीएम बंद, बँकेत पैसे नाहीत यावर पर्याय म्हणून कॅशलेसचा वापर होण्यासाठी तालुकास्तरावर अधिक प्रचार करण्यासाठी बैठका घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नोटास्वीकारू नका
पंढरपूरमंदिर समितीला आयकर विभागाकडून नोटीस नव्हे तर पत्र देण्यात आले होते. या पत्रामध्ये मंदिर समितीने जुन्या पाचशे, हजारच्या नोटा स्वीकारू नये, ज्या नोटा जमा होतील, त्या ३१ डिसेंबरनंतर स्वीकारल्या जाणार नाहीत. नोटा स्वीकारण्याबाबत मंदिर परिसरात उपाययोजना कराव्यात, असेही आयकर विभागाने सांगितल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
प्राचार्यांची आज बैठक
कॅशलेस व्यवहाराबाबत अधिक जागृती प्रसार होण्यासाठी मंगळवारी सायंकाळी वाजता शहर, जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलाविली आहे. कॅशलेसच्या प्रसार प्रचारासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाने कॅशलेससाठी दिलेल्या पर्यायांचा अधिक वापर करण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी बैठकीत आवाहन करण्यात येणार आहे.
चलन तुटवडा कायम
बँकांकडे रक्कम नसल्याने चलन तुटवडा कायम आहे. रिझर्व्ह बँकेकडून रक्कम कधी उपलब्ध होईल, याची आम्हीही प्रतीक्षा करीत आहोत. बँक ऑफ इंडियाला गुरुवारी रक्कम मिळेल, अशी अपेक्षा आहे.”- श्रीनिवासपत्की, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.
बातम्या आणखी आहेत...