आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या दुर्भिक्षेला मानवच जबाबदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जगात सर्वाधिक नद्या भारतात असूनही पाण्याची समस्या गंभीर आहे. आजही देशातील विविध राज्यांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आपण नियोजन केले नाही. पाण्याविषयी असलेली उदासीनता निष्काळजी यामुळे आज पाण्याचे संकट ओढावले. पावसाचे पाणी आपण भूगर्भात मुरवले नसल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून त्याला मानवच जबाबदार असल्याचे मत प्रशांत देशपांडे यांनी मांडले.
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे गुरुवारी सायंकाळी प्रशांत देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

जलव्यवस्थापन हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. जलव्यवस्थापनविषयी त्यांनी राज्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेतला. देशपांडे म्हणाले, आपण सर्वसाधारण चार महिने पाऊस असतो असे म्हणतो. पण ते खरे नाही. पावसाचा विचार केला तर वर्षात अवघे २५ दिवस पाऊस असतो. यात कोकण ते विदर्भात होणाऱ्या पावसाचा समावेश आहे. तासांत पाऊस मांडायचा झाला तर अवघे ९६ तास पाऊस होत असल्याचे त्यांनी सांगितले.संत तुकारामांच्या काळात सलग १३ वर्ष दुष्काळ होता. त्यावेळी भूगर्भातील पाणी कोणी काढत नव्हते.

दुष्काळाची व्याप्ती सीमा वाढतेय
अलीकडच्याकाळात दुष्काळाची व्याप्ती सीमा दोन्ही वाढत आहेत. याला भूगर्भात सातत्याने घटत चाललेली पाण्याची स्थिती कारणीभूत आहे. आज कूपनलिकेतून उपसा होणारे पाणी सुमारे ४०० वर्षांपूर्वी भूगर्भात साचलेले आहे. भूगर्भात कमी होणाऱ्या पाण्याचा परिणाम पावसावर होत आहे. कारण, भूमीच पावसाला जन्म देते. त्यामुळे भूगर्भात पाणी साचून ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर आपला प्रवास वाळवंटी प्रदेशाच्या दिशेने होईल.

इंच जमीन तयार होण्यासाठी लागतात एक हजार वर्ष
'पाणी आडवा पाणी जिरवा'नुसार पाणलोट क्षेत्राची कामे झाली नाहीत तर डोंगरावर होणारा पाऊस आपल्या सोबत जमिनीवरची माती घेून तळे अथवा नदीत जातो. यामुळे पाण्याचा उपयुक्त साठा कमी होतो. दुसरीकडे जमिनीची धूप होते. इंच जमीन तयार होण्यासाठी साधारणपणे ६०० ते हजार वर्षाचा कालावधी लागत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

२१ व्या शतकात पाणी स्फोटक बनेल
पाण्यावरूनदोन माणसांमध्ये सध्या भांडणे होत आहे. दोन माणसांतील भांडणे कालांतराने दोन गावे, दोन राज्ये, दोन देशांत रुपांतरित होईल. त्यामुळे २१ व्या शतकात पाणी स्फोटक होईल.