आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी सोडण्यासाठी कालव्यात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ/ पापरी- आष्टी उपसा जलसिंचन योजना उजवा कालवा किमी २० डावा कालवा किमी १४ पर्यंत अाष्टी जलाशयातून त्वरित पाणी सोडावे. तसेच या योजनेतील टप्पा क्र. चे काम त्वरित चालू करावे आणि आष्टी उपसा जलसिंचन टप्पा क्र. वरील सर्व कामांच्या गुणवत्तेबाबत उच्चस्तरीय आयोगाकडून चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. 

कोन्हेरी गावाजवळील उजवा कालवा क्रमांक दहा कालव्यात उतरून शेतकऱ्यांनी सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. शेतक ऱ्यांनी आपली जनावरेही सोबत आणून कालव्यात बांधली आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून या काळात कुणीही अन्नपाणी घेणार नाही तसेच जनावरांनाही चारा -पाणी घालणार नसल्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी अॅड. विलास शेळके, राजकुमार पाटील, नाना कौलगे, मारुती भांगे, रामचंद्र शेळके, तानाजी मुळे, विष्णू पवार, पांडुरंग भोसले यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

याबाबत मीमाहिती घेतो. यापूर्वी यासंदर्भात शेतकरी भेटण्यासाठी आले होते. भूसंपादनाचे पैसे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोलापूर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावण्याचा प्रयत्न करू. 
- संजय कुलकर्णी, चिफ इंजिनिअर, सिंचन विभाग पुणे 

दीड वर्षापूर्वीजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आष्टी उपसा जलसिंचन योजनेचे लोकार्पण केले. त्यानंतरही काम मार्गी लागत नाही. अधिकारी हे आष्टी उपससिंचन प्रकरणी शेतकऱ्यांना त्रास देण्याची भूमिका घेत आहेत. प्रभाकरदेशमुख, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना. 

या योजनेलापुन्हा खर्च करण्याची परवानगी अथवा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच भूसंपादनाचा साडेसात कोटींचा प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. त्यालाही लवकरच मान्यता मिळेल. रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. बी.एस. बिराजदार, कार्यकारी अभियंता, आष्टी जलसिंचन योजनेतील उजव्या डाव्या कालव्यासाठी संपादित झालेल्या जमिनीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. कार्यकारी अभियंता बिराजदार, उप अभियंता जीवने, कनिष्ठ अभियंता साबळे यांनी पाणी सोडण्याबाबतचे लेखी आश्वासन हमी दिलेली होती. तरीदेखील अद्यापपर्यंत पाणी सोडले नाही संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. जाणूनबुजून टाळाटाळ करणाऱ्या या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना सेवेतून काढून टाकण्यात यावे आदी. 
बातम्या आणखी आहेत...