आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरातील पुलावरुन पती- पत्नी वाहून गेले; शोध लागेना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर-  भीमा नदीवरील अजनसोंड-  मुंढेवाडी या बंधाऱ्यावरुन दुचाकीवर जात असताना वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनवलीकडे निघालेले दांपत्य दुचाकीसह पाण्यात वाहून गेले. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली. सुरेश बनकर व वंदना बनकर असे या दांपत्याचे नाव अाहे. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात पोलिसांकडून शोध सुरु होता मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. अंधारामुळे शोध मोहिमेमध्ये अडचणी येत होत्या.
बातम्या आणखी आहेत...