आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा स्मृती मंदिराच्या हुतात्मा स्मृती मंदिराने कलावंत, संयोजकांची होतेय गोची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका संचलित हुतात्मा स्मृती मंदिर हे कार्यक्रमाच्या दृष्टीने जनतेस उपयुक्त व्हावे म्हणून सुरू करण्यात आले. मात्र सध्या या मंदिराचे भाडे सामान्य जनतेला परवडेनासे झाले आहे. दिवसात चार सत्र ठेवणाऱ्या मनपाने एक सत्र कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार वेगवेगळे ठरविले आहे. मात्र किमान एक सत्र ५००० ते ७०५० अधिक १५ टक्के सेवाकर असे आहे. त्यामुुळे एखाद्या शाळेला किंवा सेवाभावी संस्था अथवा सामाजिक संस्थांना कार्यक्रम आयोजित करणे खर्चिक झाले आहे. वर्षाकाठी ३० लाखांच्या आसपास उत्पन्न देणारे हुतात्मा ज्या हेतूने सुरू केले, तो बाजूला पडून त्याचे तद्दन व्यावसायीकरण झाले आहे. त्याचा सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
नूतनीकरणासाठी एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर हुतात्मा स्मृती मंिदर पुन्हा एकदा कलावंतांसाठी, संस्थांसाठी आणि रसिकांसाठी खुले झाले. भाड्यात मात्र, तब्बल १००० ते २़००० हजारांनी वाढ करण्यात अाली. खरे पाहता या वास्तूचा कलावंतांच्या फायद्यासाठी सांस्कृतिक चळवळीचे केंद्र व्हावे त्याने सांस्कृतिक प्रवास सोपा व्हावा म्हणून उपयोग होणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेला कलावंत आणि इतर रसिकांशी काही देणे घेणे नाही असे चित्र आहे.

दुर्गंधीचे साम्राज्य
गेल्यादोन वर्षापासून स्वच्छतागृहाचा मक्ता दिला जातो. मात्र विविध कार्यक्रमानंतर स्वच्छतागृहांची अवस्था प्रचंड वाईट असते. त्याचीही दक्षता घेतली जात नाही. छोट्या मुलांना आणि महिलांना या अस्वच्छतेचा त्रास होतो. त्यात बाहेरच्या अनेक लोकांना स्वच्छतागृह सहज उपलब्ध नसल्याने अनेकदा हुतात्माच्या स्वच्छतागृृहांचा वापर केला जातो. त्यामुळे प्रचंड घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले असते.

नाटकवाल्यांची गळचेपी होते
^व्यावसायिक नाटकाला लोक येतात. तरी पण हौशी रंगमंचावर काम करणाऱ्या लाेकांना पाहण्यासाठी कधी कधी लोक येत नाहीत. खर्च प्रचंड आहे. तो व्यावसायिक असो किंवा हौशींचा त्यात नाटक जगणे अवघड आहे. एकीकडे शासन नाटकाला उत्तेजन देते म्हणते आणि दुसरीकडे नाटकासाठी भाडे कमी करण्याचेही प्रयत्न करत नाही. त्यामुळे विरोधाभास वाटतो. मीरा शेंडगे, कलावंत

इतर भाड्यांची वाढ नको
^१९८४सालापासून हजार भाडे आहे. मात्र गेल्या दोन वर्षात भाडे वाढ केली आहे. ती इतर थिएटरच्या तुलनेने जास्त नसली तरी अनामत रक्कम आाणि सेवा कर याची रक्कम अधिक आहे. त्यामुळे याचा फटका बसतो. लावणीच्या आणि ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला ३० हजार रक्कम अनामत ठेवायची आहे. तर १० हजार रुपये अनामत रक्कम नाटकासाठी. ही वाढ रक्कम मोठी आहे. एखाद्याकडे रक्कम जास्तीची नसेल तर त्यांनी काय करायचे याचा विचार झाला पाहिजे.” शकुर सय्यद, माजी व्यवस्थापक

कार्यक्रमानुसार तीन तासांचा दर, खर्च जास्त अाहे म्हणून दर जास्त
^हुुतात्मा देखभाल करण्यासाठी त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रचंड खर्च आहे. त्याने कर्मचारी वीज बिल आणि इतर खर्च याचाच खर्च भागत नाही. मग अजून भाडेे कमी कसे करणार. याने हुतात्माच्या संवर्धनावर परिणाम हाईल.” लक्ष्मण चलवादी, नगरअभियंता

खर्च खूप आहे
^लाइटबिल जास्त येते. स्वच्छतागृहाचे टेंडर दिले आहे. एसीचे टेंडर दिले आहे. त्याला प्रचंड खर्च आहे. शिवाय लाइटबिल किमान लाख ७५ हजार ते लाखांचे येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. यात कर्मचा-यांचा पगार नाही. तो वेगळाच आहे. त्यामुळे अधिक खर्च असल्याने ही भाडे वाढ सर्वसाधारण सभेत सगळ्यांच्या संमतीने ठरविली आहे.” रमेशजोशी, व्यवस्थापक
सत्र चार सकाळी ते १२ दुपारी १२ ते दुपारी ते संध्याकाळी ते असे असतात. वर्षाकाठी हुतात्माचे उत्पन्न आहे २९ लाख.
तालमींनाही संधी नाहीच
राज्यनाट्य स्पर्धा आणि इतर कार्यक्रमांच्या तालमींसाठी एरवी जे भाडे आकारले जाते त्याच दरात तालमींनाही दर आकारले जात असल्याने हल्ली रंगीत तालमींकडेही रंगकर्मींचा ओढा कमी झाला आहे.
कुवत असून पैशामुळे संधी नाही
आर्थिक स्थिती नसलेल्या शाळांना एक किंवा दोन सत्रांच्या कार्यक्रमांसाठी १२ हजारांच्या आसपास रक्कम भरणे अशक्य असल्याने त्यांना स्मृती मंदिरच्या सुंदर आणि मोठ्या रंगमंचावर मोठी संख्या उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या समोर प्रयोग करणे अथवा स्नहे संमेलनाचे कार्यक्रम करणे शक्य होत नााही. त्यामुळे कुवत असली तरी या मंचावर प्रयोग करण्याची संधी त्यांना मिळत नाही.
कार्यक्रमांमुळे परिणाम
भाडेवाढीमुळे गेले दोन वर्ष छोट्या प्रकारचे कार्यक्रम कमी झाले आहेत. तर डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहास तीन तासांसाठी एसी सभागृहासाठी हजार १७५ रुपये सर्व सोयीने युक्त तर ए. सी. नसलेले सभागृहाकरिता हजार ४५० रुपये असे दर आकारले जातात.
१५०० ते २००० रुपयांचा फरक
२०१४साली एका सत्रास ३००० हजार रुपये दर होता. दिवसभराला १२ ते १३ हजारांचा खर्च येत असे. मात्र तो दर २०१५ मध्ये हजारांनी वाढविण्यात आला म्हणजे तो हजार सेवा कर १३ ००ते १५०० रुपयांपर्यंत करण्यात आला. तो प्रत्येक सत्रानुसार किमान १५०० ते २००० असा वाढला. मात्र पुढे त्यात पुन्हा वाढच होत चालली आहे. त्यामुळे लोकांची नाराजी वाढली आहे. कारण दिवसभराच्या कार्यक्रमाचे आयोजन करावयाचे असेल तर संयोजकांनी किमान भाडे आकारावे.
इतर शहरांच्या तुलनेत खर्च
सोलापूरशहराच्या मानाने इतर शहरातील नाट्यगृहांचे भाडे हे हजार पाचशेने कमी जास्त आहे. यात सुविधा परिपूर्ण असतात. यामध्ये मंुबईतील महापालिकेच्या नाट्यगृहांना १० हजार एका सत्रास सगळ्या सुविधांसहित आहे. पुण्यात एका सत्रास हजार ते हजार रुपये खर्च आहे. तर नाशिकच्या नाट्यगृहाला इतकेच भाडे आहे.
खुर्च्याची बोंंब सुरूच
लाखाे रुपयांचे खर्च करून हुतात्माचे नूतनीकरण केले आहे. मात्र महागडी खुर्ची असल्याचा उल्लेख केला गेला, त्या हलक्या दर्जाच्या असून एका वर्षातच मोडल्या आहेत. तर काही खुर्च्यांची अख्खी रांगच्या रांग हलते आहे. त्यामुळे बसताना प्रेक्षकांना असुरक्षित वाटते आहे. असे सगळे उन्नीस-बीस असतानाही मोठ्या प्रमाणावर दर आकारून मनपाने ठरवून लूट सुरू केली आहे.
आपल्या प्रतिक्रिया: तुमच्यानावासह ९२०००१२३४५याक्रमांकावर एसएमएस करा
बातम्या आणखी आहेत...