आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस चले तो... मैं ओपन बुक सिस्टिम लाऊंगा..!, तावडेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- मेरा बस चले तो मैं.. ओपन बुक सिस्टिम लाऊंगा.. परीक्षेत पुस्तक घेऊन बसा व लिहा.. आपल्याकडे काय झालेय एका प्रश्नाचे एकच उत्तर.. शाळेत शिकवले जाते वर शब्दाला विरुद्धार्थी शब्द द्या.. विद्यार्थी लिहितात.. खाली... बरोबर गुण मिळतो. एक लिहितो.. वधू ... त्याला मात्र शून्य गुण.. का हो..? त्याचे उत्तर चूक असते का? हटके विचार करणारा रँचो बना..चतुर रामलिंगम नको... एका प्रश्नाचे एकच नव्हे, पाच प्रकारे उत्तरे देता आली पाहिजेत, ओपन बुक सिस्टिममधून असे रँचो बनू शकतील, घोकंपट्टी करणारा चतुर नाही, असे मत उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले
सोलापूर विद्यापीठातील नॅक सेल कक्षाचे तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी उद््घाटन झाले. या वेळी विद्यार्थ्यांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ओपन बुक सिस्टिममधील प्रश्नपत्रिका काढणारा व सोडवणारा दोघांचीही कसोटी पाहणारी असेल. यात विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही अभ्यास करावा लागेल. अशी पद्धती आली तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी ज्ञानसंपन्न होईल.
शिक्षणाचे बाजारीकरण : शिक्षणाचे बाजारीकरण होतेय, अशी खंत एका विद्यार्थ्याने मांडली. त्यावर तावडे

म्हणाले, माझे हेच खरे दु:ख आहे. ट्रेनिंग आॅफ द ट्रेनर्स सध्या अवघड झाले आहे. वयाची तिशी ओलांडली की आपल्याला सगळे कळते असा ग्रह होऊन बसतो. शिक्षकांना प्रशिक्षण देणे म्हणूनच अवघड ठरते. १९८० नंतर शिक्षणक्षेत्राचा काळ कमालीचा बदलला. त्याआधीचे शिक्षण मुलांना आवडायचे. आता काळ, शिक्षणव्यवस्था बदलली. दहावीत कोणी नापास होणारच नाही अशीच व्यवस्था आहे. ९०-९५ टक्के निकाल लागतो. नापासांसाठी मे अखेरीस पुन्हा परीक्षा. ९६ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. सर्व मुलांतील व्यावसायिक किंवा अंगभूत कौशल्य ओळखले जावे, हीच अपेक्षा शिक्षणातून पूर्ण होणे अपेक्षित आहे. ते गुण विकसित करण्याची जबाबदारी माझी असेल. अनेक चांगले शिक्षक आहेत. असेच शिक्षक समाजाची बांधणी करतील.

विद्यापीठ आयफेल टाॅवरसारखे : एका जिल्ह्यासााठी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. अपेक्षा अशी आहे की स्थानिक परीक्षेत्रातील गरजा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ कार्य करणार. बांधणी उत्तम, कार्य उत्तम होते आहे. अनेक बाबतीत प्रगती साधली जाते आहे. तरी वाटते की विद्यापीठाची अवस्था आयफेल टॉवर सारखी आहे.