आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणांनी माझ्याकडे यावे, मी सहकार्य करेन; विकासाच्या चर्चेत खासदार बनसोडे यांचे प्रतिपादन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- ‘सोलापुरातमेगा फुड मॉल आणण्याचा प्रयत्न करतोय. हे जर आले तर सुमारे दहा हजारजणांना रोजगार उपलब्ध होईल. उद्योगवाढीसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या आणि तुम्हाला सहकार्य करेन’, असे प्रतिपादन खासदार शरद बनसोडे यांनी केले. वेक अप सोलापूर या संघटनेतर्फे समाज कल्याण केंद्रात ‘थांबा सोलापूरकरांनो’ हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 


ते पुढे म्हणाले, सोलापुरात टॅलेन्ट खूप आहे. नवनवीन उद्योग आणण्याचा आम्ही प्रयत्न करतायेच. तरुणांनी स्वप्न मोठे पहावेत, शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन सोलापूरात उद्योग उभे करा. तरुणांनी नवीन उद्योगधंदे सुरू व्हावेत, सोलापूरचे रस्ते सुधारावेत, सोलापूर खरोखरच स्मार्ट व्हावा, आदी भावना व्यक्त केल्या. संस्थेच्या माध्यमातून उपस्थितांकडून आपल्या सोलापूरसाठी काय हवे, सोलापूरची स्वत:चे काय योगदान असेल या विषयावर मते घेण्यात आली. यावेळी मिलिंद भोसले, नरेंद्र भोसले, मनोहर शिराळ, शाहू बिराजदार, प्रियंका डोंगरे, अमोेल घोडसे, संदीप मोहिते आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...