आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखपत्रासाठी मतदारांचे हेलपाटे, होलोग्रामअभावी खोळंबले मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मतदान ओळखपत्रावर होलोग्रामचा वापर केला जातो. हे होलोग्राम नसल्याने तालुक्यातील मतदान ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया खोळंबली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मतदार त्रस्त आहेत.
उत्तर साेलापूर तहसीलमधून शहर उत्तर (२४८) शहर मध्य (२४९) या दोन्ही विभानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाज चालते. या दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र दोन नायब तहसीलदार काम पाहतात. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून एकाच नायब तहसीलदारावर कामकाज सुरू आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हद्दवाढ भागातील काही भाग. झोपडपट्ट्यांचा अधिक समावेश आहे. वेगवेगळ्या शासकीय कामकाजासाठी मतदान ओळखपत्राची गरज भासते. कारण शासनाचे मतदान ओळखपत्र हे मतदानाबरोबरच शासनाच्या इतर कामांसाठी अधिकृत ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाते.

ज्यांची नावे मतदारयादीतून वगळली आहेत, ज्यांच्या नावात अन्य माहितीत चुका आहेत आणि वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेले नवमतदार, नव्याने या मतदारसंघात राहावयास आलेल्या मतदारांनी तहसील कार्यालयाकडे मतदार नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. तसेच सरकारने आठ आॅक्टोबर सात नोव्हेंबर या कालावधीत विशेष मतदार नोंदणी दुरुस्ती मोहीम राबवली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु याआधी दिलेल्या अर्जांवर आजतागायत काम झाल्याने ते तहसीलमध्ये पडून आहेत. प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर अर्जदारांनी त्यात अपुरी माहिती दिल्याने त्यांची ओळखपत्रे तयार करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. तसेच तयार ओळखपत्रांसाठी पुरेसे होलोग्राम नसल्यामुळे वितरण थांबले आहे. एकूण प्रशासकीय दिरंगाईचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. तातडीने मतदान ओळखपत्रे द्यावीत, अशी मागणी होत आहे.

मार्गदर्शक फलक नाही
प्रशासनमतदारांनी अर्जात पुरेसी माहिती भरली नसल्याचे कारण पुढे करत आहे. परंतु त्यांना अर्ज कसे भरावयाचे याची माहिती मिळावी, यासाठी मागदर्शक सूचनांचे फलक कार्यालयात लावावे, हे कर्तव्य वाटत नाही. माहितीअभावी मतदार अर्जात अपुरी माहिती भरतात. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा त्यांना त्रास सोसावा लागतो.

मतदार नोंदणीसाठीसहा महिन्यांपूर्वी अर्ज दिला आहे. दोनवेळा तहसीलकडे चौकशी केली. परंतु होलोग्रामच नसल्याचे सांगण्यात आले. मतदान ओळखपत्र नसल्यामुळे ओळखीच्या पुराव्यासाठी अडचणी येत आहेत.” पिराजी दळवे, नागरिक,कोंडी

मतदारांकडून अर्जातअपुरी माहिती, होलोग्रामचा तुटवडा यामुळे मतदान ओळखपत्राचे वाटप थांबले आहे. त्यात माझ्याकडे दोन मतदारसंघांचा प्रभार आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामाची गती संथ आहे.” यू. डी. जाधव, नायबतहसीलदार

तालुक्यातील सद्य:स्थिती
- विशेषमोहिमेंतर्गत दाखल अर्ज ८,७३३
- होलोग्रामची मागणी ५०,०००
- होलोग्रामचा पुरवठा ९,०००
बातम्या आणखी आहेत...