आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत ऊस बिल २० सप्टेंबरपर्यंत दिल्यास संचालकांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे उसाच्या एफआरपीची ९३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकीत रक्कम २० सप्टेंबरपर्यंत दिल्यास कारखान्याच्या अध्यक्षासह संचालक मंडळांवर गुन्हा दाखल होईल, असा इशारा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी गुरुवारी दिला.

कारखान्याकडे थकीत रकमेबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित कारखान्याचे अध्यक्ष, संचालक व्यवस्थापकीय संचालकांची बैठक घेतली. आदिनाथ कारखान्याचे दिग्विजय बागल, कुर्मदास कारखान्याचे धनाजी साठे, साखर आयुक्त कार्यालयातील सहसंचालक विजय घाडगे, लेखाधिकारी एस. पी. रोडगे, श्रीधर कोल्हापुरे आदी उपस्थित होते. करकंब येथील विजय शुगर्स खामगाव येथील आर्यन शुगर्सचे प्रतिनिधी गैरहजर होते.

संत कुर्मदास अादिनाथ सहकारी - यादोन्ही कारखान्यांच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या थकीत रकमा देण्यासाठी बँकांकडे कर्जाची मागणी केली आहे. कर्ज उपलब्ध होताच एफआरपीनुसार थकीत रकमा देण्याची कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.

शंकररत्न शुगर्स, आलेगाव - शंकररत्न शुगर्समध्ये चाचणी गळीत हंगाम होता. यामुळे कारखान्याची एफआरपी रक्कम किती हेच माहिती नाही. साखर आयुक्तांनी एफआरपीची रक्कम कळविली नसल्याने रक्कम देता आली नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले.

विजय शुगर्स आर्यन शुगर्स - यादोन्ही कारखान्याकडे अनुक्रमे ११ २१ कोटी रुपये थकीत आहेत. या दोन्ही कारखान्यांच्या अध्यक्ष संचालकाची मालमत्ता, बँक खाते याची माहिती घ्यावी. साखर आयुक्तांकडून मालमत्ता, बँक खाते सील करून त्या जप्त करण्याबाबत साखर आयुक्तांकडून परवानगी घेण्याबाबत मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

तहसीलदारांनी माहिती घेऊन कारवाई करावी
जिल्हाधिकारीरणजितकुमार यांनी कारखान्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्या कारखान्यांवर कारवाईबाबत न्यायालयाची स्थगिती आहे, त्याबाबत संबंधित तहसीलदारांनी न्यायालयात वस्तुस्थिती मांडण्याचे आदेश दिले. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ कारखान्यावर अंतिम नोटीस बजावून पुढील कारवाई करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार यांना दिले. टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना वगळता इतर एकाही कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा केली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सहसंचालक विजय घाडगे यांना याबाबत ज्या कारखान्यावर कारवाई करणे शक्य आहे, त्याबाबत तातडीने आदेश करावेत, अशी मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...