आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Planning Successful, Then Day After Water Possible Tukaram Mundhe

नियोजन झाल्यास दोन दिवसांआड पाणी शक्य - तुकाराम मुंढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होईल इतके पाणी उपलब्ध आहे. पण पाणीपुरवठा यंत्रणेत त्रुटी अाहेत. त्या दूर करून एक ते दीड तास समान पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. त्यानुसार वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आराखडा मागवला आहे. शहरातील पाण्याची गळती रोखण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्रभारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना दिली.

शहर पाणीपुरवठ्याचे गणित मांडणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा तात्पुरता पदभार १० एप्रिलपर्यंत आहे. पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरात १०५ एमएलडी पाण्याची आवक होत असून, त्यापैकी ६० एमएलडी पाणी वितरण व्यवस्थेसाठी मिळते. अन्य ४५ एमएलडी पाणी जाते कोठे? हा प्रश्न आहे. ४५ पैकी २५ एमएलडी पाण्याची गळती शोधून समान पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. काही भागात तास तर काही भागात पाच ते सहा तास पाणीपुरवठा होतो. यांच्यात समानताआणून दीड तास पाणीपुरवठा केल्यास शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो, असा अाशावाद मुंढे यांनी व्यक्त केला.
नियोजन करता तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करून मला हिरो व्हायचे नाही. कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न अाहे, असे मुंढे म्हणाले.

जलवाहिनी दुरुस्ती सुरू
टाकळी ते सोरेगाव दरम्यान जलवाहिनीला सात ठिकाणी गळती असून त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता टाकळी येथील पंप बंद करण्यात आले होते. मंगळवारी पहाटे पंप सुरू होतील. उजनी ते सोलापूर जलवाहिनीची गळती दुरुस्ती शनिवारी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपअभियंता संजय धनशेट्टी यांनी दिली.

‘मुंढेंना आयुक्त करा’
महापालिकेचे प्रभारी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनपाचे उत्पन्न आणि पाणीपुरवठा दोन दिवसाआड करणार असतील तर त्यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा कायमचा पदभार द्यावh. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करू, अशी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक माहिती सुरेश पाटील यांनी दिली.