आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवे बनावट आढळल्यास एजन्सीवर फौजदारी करू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाळा - नगरपालिकेमार्फत शहरात बसविण्यात आलेले एलईडी दिवे हे हॅवल्स कंपनीचे आहेत की बनावट आहेत, याविषयीची हॅवल्स कंपनीकडे पत्राद्वारे अहवालाची मागणी केली आहे. हे एलईडी दिवे बनावट निघाल्यास संबंधित ठेकेदाराविरोधात फौजदारीची कारवाई केली जाईल. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्याधिकारी डॉ. पंकज जावळे यांनी यावेळी सांगितले.
नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संजय सावंत यांनी शहरात बसविलेले ९० वॅटचे ६० दिवे ४५ वॅटचे २४५ दिवे हॅवल्स कंपनीचे नसल्याची लेखी तक्रार नगरपालिकेकडे केली आहे. त्यांनी कंपनीकडे पत्रव्यवहार करून हे दिवे त्यांचे आहेत का, याची विचारणा केली होती. हॅवल्स कंपनीने या दिव्यांचा पुरवठा केला नसल्याचे सांगत ४५ वॅटच्या दिव्यांचे उत्पादनच करत नसल्याचे स्पष्ट केले होते. कंपनीचे ते पत्रही सावंत यांनी त्या तक्रारीसोबत जोडले होते. प्रज्वल भारत सोलार लाइट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड पुरवठादार एजन्सीला नगरपालिकेने दिव्यांच्या पुरवठ्याचा ठेका दिला होता. या दिव्यांची थेट कंपनीकडून खरेदी केल्यास कंपनी एमआरपी िकमतीवर ४० टक्के सवलत देते. असे असताना नगरपालिकेने हे दिवे मर्जीतील ठेकेदाराकडून का खरेदी केले, असा सवाल नगरसेवक सावंत यांनी केला होता.

...तरठेकेदार काळ्या यादीत
यासंदर्भातमुख्याधिकारी डॉ. जावळे म्हणाले, या कामाची ई-निविदा काढली होती. यात सहभागी झालेल्या कंपन्यांतून कमी किमतीची निविदा नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाने मंजूर केली आहे. आता बसवलेले दिवे हॅवल्स कंपनीऐवजी बनावट कंपनीचे निघाल्यास ही िनविदा रद्द केली जाईल. तसेच या पुरवठादार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून नवीन िनविदा प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी नगरपालिकेने हॅवल्स कंपनीकडे पत्राद्वारे हे िदवे त्यांचे आहेत का, याविषयी विचारणा केली आहे.

काळ्या यादीत टाका
नगरपालिकेनेिदवे पुरवठ्याची िनविदा रद्द करावी. बनावट एलईडी दिवे पुरवठा करणाऱ्या एजन्सीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. संबंधित एजन्सीला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना आंदोलन करेल.” विवेकयेवले, जिल्हा उपाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना

४५ वॅटचे दिवे कोठून आले?
हॅवल्सही जागतिक दर्जाची कंपनी आहे. या कंपनीचे शिक्के मारून चायनामेड एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. हॅवल्स ४५ वॅटच्या दिव्यांचे उत्पादनच करत नाही. मग नगरपालिकेकडे त्या कंपनीचे ४५ वॅटचे दिवे आले कोठून? ४९ लाख रुपयांच्या व्यवहारात ३० लाख रुपयांचा सत्ताधाऱ्यांनी गैरप्रकार केला आहे.” संजयसावंत, विरोधी पक्षनेते, नगरपालिका