आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पालकमंत्र्यांच्या पाठीशी की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेच्या तयारीनिमित्त जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सायंकाळी वाजता विविध विभाग प्रमुख यात्रा समितीचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. जिल्हा प्रशासन यात्रा समिती यांच्यातील ही तिसरी बैठक असणार आहे. याआधी मॅटिंग आपत्कालीन मार्ग यावर एकमत झाल्याने मंदिर समितीचे पदाधिकारी निघून गेले होते. यानंतर मंदिर समिती जिल्हा प्रशासन यांच्यातील दरी वाढतच गेली. त्याचे रूपांतर जिल्हाधिकारी यांच्या विरोधातील मोर्चामध्ये झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने या बैठकीबाबत यात्रा समिती पदाधिकारी यांनाही पत्र दिले आहे. या बैठकीला यात्रा समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार का ? बैठकीत काय निर्णय होणार ? यावर पुढील नियोजन ठरणार आहे. बुधवारी जिल्हाधिकारी मुंढे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
वादावर लवकरच तोडगा काढणार - फडणवीस
श्रीसिद्धेश्वर देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात निर्माण झालेला वाद मंगळवारी हिवाळी अधिवेशनात पोहोचला. आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तुम्ही पक्षाचे नेते पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी आहात की नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाठिशी, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.
आमदार शिंदे यांनी याप्रसंगी उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली. डिसेंबरअखेरपर्यंत पाण्याचे आवर्तन मिळाल्यास फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भीषण पाणी टंचाईला सोलापूरकरांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत उजनी धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बातम्या आणखी आहेत...