आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयएलएफएस’च्या टोलमधून साडेसोळा कोटी दंड वसुली करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी मक्तेदार आयएलएफएस कंपनीच्या टोल वसुलीतून दंडाची रक्कम वसूल करावी, असा आदेश अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांना दिला आहे. कंपनीकडून १६ कोटी ४३ लाख २८ हजार रुपये दंड वसूल होणार आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांमधून या महामार्ग विकासक कंपनीने लाख २२ हजार ब्रास मुरूम विनापरवाना उपसा केला. याप्रकरणी कंपनीचे प्रांताधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी अपील नामंजूर केेला आहे. संबंधित विकासक कंपनी टोल वसूल करीत आहे, टोलच्या रकमेतून दंड वसूल करावा आणि तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.

कंपनीने २०११ २०१२ या कालावधीत बेकायदा मुरूम उपसा केला आहे. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार अंजली मरोड यांनी तपासणी केली. तपासणीमध्ये कंपनीने लाख २२ हजार ब्रास मुरूम उपसा केल्याप्रकरणी १६ कोटी ४३ लाख रुपये रॉयल्टी तीनपट दंडाची नोटीस बजावली होती. या कारवाईविरोधात कंपनीने प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. या दोन्ही ठिकाणी कंपनीचे अपील फेटाळण्यात आले. अपील नामंजूर करून तहसीलदारांचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे.

टोलमधून वसूल करा
प्रकल्प संचालक यांना कंपनीकडून टोलवसुली केली जात आहे, या रकमेतून दंडाची रक्कम भरून घ्यावी, असे पत्र दिले आहे. प्रवीणकुमार देवरे, अपर जिल्हाधिकारी

पत्रच मिळाले नाही
आयएलएफएस कंपनीकडून दंड वसुलीचे पत्रच मिळाले नाही. यामुळे वसुलीचे अधिकार कारवाईसंबंधी काहीच बोलता येणार नाही. बी.बी. इखे, प्रकल्प संचालक, प्राधिकरण