आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: देशी दारूची अवैध वाहतूक; तिघांना पकडले, दोन आरोपी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- अवैधरित्या देशी दारूची वाहतुक करतांना तीन जणांना पकडले. यावेळी दोन आरोपी फरार झाले आहेत. आरोपीकडून ४८ हजार रुपये किमतीच्या २६४ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुलडाणा मलकापूर राज्य महामार्गावर काल १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी करण्यात आली आहे.
 
मागील काही दिवसापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुरूवात झाली असून आज १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले. दरम्यन, राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण यांना देशी दारूची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. या माहिती वरून भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुलडाणा मलकापूर राज्य महामार्गावर सापळा रचला. 

यावेळी आरोपी रोशन चंदनसिंग राजपुत रा. वरखेड गणेश शिवाजी धोरण रा. उमाळी ता. मलकापूर हे दोघे दुचाकीने अवैध देशी दारूची वाहतुक करतांना आढळून आले. तर देऊळघाट येथील रहिवासी अशोक सुखदेव पन्हाळे याच्या घरी छापा टाकला. आरोपीच्या ताब्यातून ४८ हजार २५० रुपये किंमतीच्या २६४ देशी दारूच्या बाटल्या एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तर दोन आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले आहेत. प्रकरणी आरोपी विरुध्द मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण हे करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...