आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर मंदिरातून "आय एम बॅक'चे चित्रीकरण सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विस्तीर्ण जलाशयाच्या एका बाजूला प्राचीन किल्ला आणि मधोमध चिरेबंदी दगडातील मंदिर. हिरवळीने नटलेला मंदिराचा परिसर. गुरुकुल पद्धतीने सुरू असलेले बटूंचे शिक्षण. निरव शांतता प्रसन्न करणारी. पाखरांची किलबिल. मधूनच निनादणारा गाभा-यातला घंटानाद. श्रद्धाळूंची असलेली रेलचेल. ग्रामदैवतांच्या मंदिरातील हे वातावरण हिंदी चित्रपटसृष्टीला आकर्षून घेतले नाही तरच नवल. त्यातही या मातीवर प्रेम करणारा दिग्दर्शक असेल त्याला हे स्थान खेचून आणणारच. सोलापूरचे सुपुत्र आणि बॉलीवूडमधील नामवंत दिग्दर्शक नईम शेख यांनी रविवारी "आय एम बॅक' या हिंदी चित्रपटाचा शुभारंभ ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातून केला.
दुपारच्या उन्हात सिद्धेश्वर मंदिरात कोली फिल्म प्रॉडक्शनच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. चित्रीकरण पाहण्यासाठी सोलापूकरांनी गर्दी केली होती. नईम यांनी पहिला प्रसंग आपल्या लाडक्या ग्रामदैवताच्या मंदिरात ठेवला होता. दिवसभर शूटिंग सुरू असताना ते मंदिरात तळ ठोकून होते. यावेळी तीन प्रसंग चित्रित करण्यात आले. त्यात मंदिराचा काही भाग चित्रित करण्यात आला. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात नवे कलावंत मडालसा शर्मा आणि लहुश कोली यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बॉलीवूडमधील अनेक कलांवत यात काम करणार आहे.
सीध्देश्रवर मंदीरात चीत्रपटाचे चीत्रीकरण् करताना.

नईम यांची यशस्वी वाटचाल
सोलापुरातीलविजापूर रोड भागात राहणारे नईम हे आकाशवाणी केंद्राचे माजी विभाग प्रमुख के. ए. शेख यांचु सुपुत्र. व्यवसायाने अभियंता असणारे नईम हे गेली १५ वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. २००१ मध्ये त्यांनी सनी देओल, माधुरी दीक्षित आणि शाहरूख खान यांच्या ये रास्ते है प्यार के चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू केली. माय नेम इज गोन्सालवीस, अल्लाह के बंदे, दे ताली, एन एच १३, प्यार है आदी अशा अनेक चित्रपटांसाठी स्वतंत्र दिग्दर्शन सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

सोलापूरवरील प्रेमापोटी
मीपूर्वीही एक चित्रपट सोलापुरात चित्रित केला आहे. एनएच १३ मधून मी सोलापूर रेखाटले आहे. आताही मला या चित्रपटाची सुरुवात सोलापूरच्या मंदिरातूनच करायची होती. मी सोलापूरवर खूप प्रेम करतो. त्यामुळे चित्रीकरणाची सुरुवात येथून केली आहे.'' नईमशेख, युवा दिग्दर्शक