आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात ३० टक्के व्यवहार थांबले, मुख्य सचिवांनी घेतला नोटा बंदीनंतरचा आढावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर काळा पैसा बाळगणारे नाना युक्त्यांची चाचपणी करताहेत. कुणी सोने घेतले, कुणी ठेकेदारामार्फत बँकांच्या रांगेत सामान्यांना उभे केले. त्याच्याही पुढे जाऊन दुसऱ्यांच्या खात्यात पैसे भरण्याचे प्रकारही सुरू झाले.
काही शिक्षणसम्राट तर चक्क कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे देऊन नंतर देण्याचा शब्द त्यांच्याकडून घेतला. अशा अनेक बाबी केवळ चर्चेच्या नाहीत, तर त्याची शहानिशा करणारी एक स्वतंत्र यंत्रणाच कार्यरत झाली आहे. या गोष्टी आयकर खात्याच्या रडारवरच आहेत. तपासणीत या गोष्टी आढळून आल्या तर थेट तुरुंगात जाल, असा इशारा आयकर खात्याचे येथील सहायक आयुक्त मृण्मय रामटेके यांनी दिला.
नोटाबंदीनंतरच्या स्थितीविषयी ते म्हणाले की, अघोषित उत्पन्न जाहीर करण्यासाठी ‘अभय योजना’ दिली होती. लाभ घेतलेले सुखी झाले. जे बेफिकीर राहिले ते आता अडचणीत सापडले. प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर तिसरा डोळा आहे. प्रत्येक खात्याची माहिती बँकांकडून येते. संशयास्पद व्यवहारावर स्पष्टीकरण घेतले जात आहे.

नोटा बदलून घेण्याच्या रांगेत धनिक दिसत नसल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ज्यांच्याकडे काळा पैसा नाही, ते निश्चिंतच अाहेत. काळा पैसेवाले रांगेत नसले तरी इतर ‘उद्योग’मध्ये असावेत. हे त्यांना महागात पडू शकते. तसेच दानपेट्यांवर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा अाहे. शिक्षणसम्राट संस्थांतर्गत कर्मचाऱ्यांना पैसे वाटत असतील तर अशा संस्थाही आयकर खात्याच्या रडारवर येतील.
सोलापूर पाचशे,हजारच्या नोटा रद्द बँकेतील गर्दी यामुळे खुल्या जागा, तयार घरांचे व्यवहार थेट २५ टक्क्यांवर आले आहेत. मागील १० दिवसात सहनिबंधक कार्यालयाकडे झालेल्या दस्त नोंदणीची संख्या पाहता आणखी काही दिवसात यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील १६ कार्यालयांमध्ये १६६ दस्तची नोंदणी झाली होती तर १९ नोव्हेंबर रोजी फक्त ८० दस्त नोंदले आहेत.

व्यवहार३०० वरून ८० वर : सरासरीजिल्ह्यातील १६ कार्यालयांमध्ये रोज ३०० पेक्षा दस्त नोंदणी केले जात होते. मात्र नोटा रद्दच्या निर्णयानंतर पहिल्याच दिवसांपासून यामध्ये निम्म्याने घट झाली. शनिवारी (दि. १९) १६ कार्यालयातील दस्त नोंदणी फक्त ८० होती. यामुळे आता फक्त २५ टक्के व्यवहार होत आहेत.

मागील१० दिवसांतील दस्त नोंदणी : १०नोव्हेंबर १६६, ११ नोव्हेंबर १६३, १५ नोव्हेंबर - १६३, १६ नोव्हेंबर १३०, १७ नोव्हेंबर १४६, १८ नोव्हेंबर १३५, १९ नोव्हेंबर ८०.
सोलापूर महापालिका२२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान कर वसुली मोहीम घेेणार आहे. त्यासाठी उपायुक्त श्रीकांत म्याकलवार, सहाय्यक आयुक्त अभिजित हरळे यांनी बैठक घेऊन नियोजन केले. बंद झालेल्या नोटांच्या आधारे महापालिकेत कर भरता येतो. त्याची मुदत २४ नोव्हंेबरपर्यंत आहे. त्यामुळे शेवटचे तीन दिवस महापालिका कर वसुली मोहीम राबवण्यात आहे.

नोव्हेंबरपासूनपाचशे, हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर पहिला आठवडा जुन्या नोटा बदलून नवीन नोटा घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होती. दुसऱ्या आठवड्यात बँकांतील ही गर्दी कमी असली तरी बाजारातील सरासरी ३० टक्के व्यवहारावर परिणाम झाला आहे. तर किरकोळ व्यापाऱ्यांवर सर्वाधिक सुमारे ५० टक्के परिणाम झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली.

मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी निर्णयानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला. पाचशे, हजारच्या नोटा रद्दमुळे सर्वसामान्य जीवनावर नेमका कसा किती परिणाम झाला आहे. अनुचित अप्रिय घटना घडल्या आहेत का? नागरिकांना बँकांतून पैसा मिळविण्यात अडचणी येत आहेत का? याबाबत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

जणांनीघेतली भेट
लग्नकार्यासशासनाने अडीच लाख रुपये काढण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्याबाबतचे नियम आदेश सोमवारपर्यंत बँकांना मिळाले नाहीत. याबाबत आज सोमवारी जणांनी भेट घेऊन लग्नकार्यासाठी अडीच लाख रुपये देण्याचे आदेश बँकांना द्यावेत, अशी मागणी केली आहे. लग्नकार्य असलेल्या नागरिकांना बँकेतून एकाच वेळी अडीच लाख देण्याविषयी बँकांना शासनाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत कार्यपद्धतीबाबत सूचना येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी दिली.

ऊसलागवडीवर परिणाम
जिल्ह्यातीलरब्बी हंगामावर नोटा रद्दचा काय परिणाम झाला, याचीही माहिती यावेळी घेण्यात आली. जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच बहुतांश पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात ८२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. नोटा रद्दचा ऊस लागवडीवर काही टक्के परिणाम झाला आहे, शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने खत खरेदी करता येत नसल्याचे सांगण्यात आले. नोटा रद्दच्या निर्णयामुळे गेल्या १० दिवसांमध्ये सोलापूर शहर- जिल्ह्यात अनुचित वा अप्रिया घटना घडल्या आहेत का ? याची माहिती घेण्यात आली.

जिल्ह्यातून५८४ कोटी रुपये आरबीआयकडे जमा
जिल्ह्यात विविध बँकांकडे जमा झालेल्या रकमांपैकी ५८४ कोटी आरबीआयकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये स्टेट बँकेकडून ३०० कोटी तर बँक ऑफ इंडियाकडून २८४ कोटी रिझर्व्ह बँकेकडे पाठविण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेकडून नवीन नोटा बुधवारपर्यंत सोलापूरला उपलब्ध होतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.

दस्त नोंदणी घटली
^नोटा रद्द निर्णयानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस दस्त नोंदणी होती. मात्र मागील आठवड्यात दस्त नोंदणीत घट झाली आहे. नोटा रद्द बँकेतील गर्दीमुळे दस्त नोंदणीवर ५० टक्के परिणाम दिसतो.” साहेबरावदुतोंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी

या व्यवहारांवर परिणाम
जिल्ह्यातील परिवहन म्हणजेच वाहतूक, बाजार समिती, भाजी मंडई, धान्य बाजार, किरकोळ व्यापारी यावर नेमका किती परिणाम झाला याची माहिती देण्यात आली. वाहतुकीवर ३० ते ४० टक्के, भाजी मंडईवर २५ टके, धान्य बाजारावर २५ ते ३० टक्के घट झाली आहे. याबाबतचा अहवाल आरटीओ, महापालिका यांच्याकडून मागविण्यात आला आहे तर बाजार समितीच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. विशेष करून कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वाधिक ४० ते ५० टक्के परिणाम किरकोळ व्यवहारांवर म्हणजेच लहान-लहान व्यापाऱ्यांवर झाला आहे. यामध्ये किराणा दुकान, स्टेशनरी आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...