आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात स्मार्ट सिटीची लगीनघाई, व्हीजन ठरवण्याचा उद्या शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - स्मार्टसिटीचा आराखडा तीन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्प्याचे काम ३० सप्टेंबरपर्यंत आहे. पहिल्या टप्यात व्हीजन ठरवण्यासाठी नागरिकांमधून मत मागवण्यात येत आहे. सोमवारी स्मार्ट सिटीबाबत चार कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याची लगबग महापालिकेत आज दिवसभर सुरु होती.

मनपा कर्मचारी, नगरसेवक , अभियांत्रिकी कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राचार्य प्राध्यापकांसाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. 'माय गो' या संकेतस्थळावर नागरिकांनी मत नोंदवण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

३६ तास अवधी
स्मार्टसिटीचे व्हीजन ठरवण्यासाठी मंगळवार सकाळपासून बुधवारी सायंकाळ पर्यंत ३६ तास कालावधी आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले.स्मार्ट सिटी पेजमध्ये comment seclion मध्ये जाऊन आलेप व्हीजन थोडक्यात नोंदवून सेव्ह करा. त्यानंतर लॉगआउट करा.

'माय गो'वर असे नोंदवा मत
गुगलवरmygov असे सर्च करा. नंतर mygov.in या मुख्य वेबसाइटवरला सिलेक्ट करा. रजिस्टर ऑपशनवर क्लिक करा.रजिस्टरसाठी नाव, इमेल,मोबाइल नंबर भरा. sms येईल. त्याद्वारे आलेला otp लॉगीन ऑपशनमध्ये भरा आणि लॉगइन करा.त्यानंतर Discuss या ऑपशनला क्लिक करून खाली mor discussions मध्ये जावे. त्यात सोलापूर स्मार्ट सिटी पेज सर्च करा.
मुदतवाढ मिळण्याची शक्यता : स्मार्टसिटी व्हीजन ठरवण्यासाठी ३० सप्टेंबर अखेर मुदत असली तरी त्यास वाढ देण्याचा विचार शासनस्तावर सुरू आहे. पण, ते अधिकृत जाहीर केले नाही.