आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Kartiki Ekadashi, Vitthal Mandir Get 1 Crores 23 Lakh Rupee Income

कार्तिकीत 1 कोटी २३ लाखांचे उत्पन्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - यंदाच्या कार्तिकी यात्रेत १२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर या काळात मंदिर समितीकडे देणगी, भक्तनिवास भाडे असे सर्व मिळून यंदा एक कोटी २३ लाख ५२ हजार ७३७ रुपये उत्पन्न जमा झाले, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली.

आषाढी आणि कार्तिकी यात्राकाळात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक मंदिर समितीच्या विविध योजनांसाठी समितीकडे देणगी जमा करतात. असंख्य भाविक मंदिरातील देणगी पेट्यांमध्ये रोख रक्कम टाकतात. मंदिर समितीकडे अनेक भाविक देणगी जमा करून पावती घेतात, अशा देणगी पावत्या करण्यासाठी समितीकडून मंदिराच्या बाहेर स्वतंत्र व्यवस्था केली जाते. मंदिरातील दक्षिणा पेट्यांमध्ये जमा झालेली, देणगी पेट्यांमध्ये जमा झालेली आणि देणगी पावत्यांद्वारे जमा झालेली रक्कम मंदिरातच कर्मचाऱ्यांकडून मोजली जाते.

मोजणीचे काम नुकतेच पूर्ण झाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापनाने वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे सुलभ दर्शन व्हावे, यासाठी प्रयत्न केले. विशेष म्हणजे यंदा यात्रेतील महत्त्वाच्या दशमी, एकादशी द्वादशी असे तीन दिवस ऑनलाइन दर्शन बंद करण्यात आले होते. या बरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात्रेच्या काळात वशिल्याने कोणालाही दर्शनाला सोडण्यात आले नाही. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत होते.