आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात 5 हजार घरांत झाले जलपुर्नभरणाचे काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - दुष्काळग्रस्त शहर म्हणून सोलापूरची असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. वृक्ष लावणे, वृक्ष संवर्धन करणे यासोबतच भूजळ पातळी वाढवण्याचे महत्वाचे कामही प्रतिष्ठानच्या वतीने सुरू आहे. आतापर्यंत सोलापूर शहर जिल्हातील सुमारे दोन हजार विहिरींचे आणि पाच हजार घरातील बोअरच्या जलपुर्नभरणाचे काम पूर्ण झाले आहे. प्रतिष्ठानच्या वतीने हे कार्य विनामूल्य करण्यात येत आहे. १२ मे रोजी सुरू झालेली ही मोहीम १५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

डॉ. नानसाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जाते. प्रतिष्ठानचे सचिन धर्माधिकारी मार्गदर्शनानुसार सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात विहिरींच्या जलपुर्नभरणाचे काम केले गेले. दोन्ही जि ल्हे मिळून सुमारे हजार विहिरींवर काम करण्यात आले.

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धनाचे काम केले जाते. स्वच्छता मोहीम राबवली जाते. जलपुनर्भरण करण्यात येते. ही सारी कामे करण्यासाठी साधकांना ऊर्जा मिळते ती बैठकीतून. बैठकीत दासबोध ग्रंथाद्वारे संस्कारांचे पुनर्भरण करण्यात येते. यामुळे देशभरातील लक्षावधी लोकांच्या जीवनात प्रकाश आला आहे.

मूल्य, संस्कार यांचेही केले जाते पुनर्भरण
ज्यांच्या घरी जलपुर्नभरणाचे काम करायचे आहे.त्यांनी केवळ पाईप,वाळु, आदी सामुग्री उपलब्ध करणे गरजेचे आहे. उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन प्रतिष्ठानच्या वतीने पुर्नभरणाचे काम केले जाते. यात खड्डा मारणे, सॅन्ड फिल्टर तयार करणे, अशुध्द पाणी बोअर मध्ये जावु नये म्हणुन पिशव्या बसवणे आदी प्रकारची कामे केली जातात. हे काम अगदी शास्त्रशुध्दपणे केले जाते. यासाठी िवज्ञानाचा आधार घेतला जातो. नुकत्याच झालेल्या पावसामुळे प्रतिष्ठानच्या करण्यात आलेल्या विहिरी बोअरला चांगलेच पाणी आले आहे.

दोनशे सदस्यांचा चमू आहे कार्यरत
प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या बैठकीत सुरुवातीला जलपुनर्भरणाचे महत्व, ते का करावे या बाबत मार्गदर्शन केले जाते. यानंतर ज्या सदस्यांच्या घरी बोअर आहे अशांनी पुनर्भरणाचे काम करावे असे सांगितले जाते. ज्यांना आपल्या घरी हे काम करायचे आहे अशांनी आपले नाव नांेदविणे गरजेचे असते. या मोहिमेत दोनशे सदस्यांची चमू कार्यरत आहे.

प्रसिद्धीपासून दूर राहून सेवा
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून खूप व्यापक प्रमाणात पर्यावरण संवर्धनाची कामे सुरू आहेत. तरीही एकही साधक किंवा कार्यकर्ता प्रसिद्धीसाठी पुढे येताना दिसत नाही. वृत्तपत्रात नाव छापणार नाही असे सांगितल्यावरच कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...