आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षात ७८५ चोऱ्या, 3 कोटींचा गेला ऐवज - पोलिस अायुक्तांनी मांडला वार्षिक अाढावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मागील वर्षभरात (सन २०१५) ७८५ चोऱ्या झाल्या. दोन कोटी ९५ लाख ८२ हजार २७ रुपयांचा एेवज चोरीस गेला अाहे. त्यापैकी १९९ चोऱ्या उघडकीस अाल्या तर ५३ लाख ४३ हजार ८४७ रुपयांचा एेवज जप्त करण्यात अाल्याची माहिती पोलिस अायुक्त रवींद्र सेनगावकर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. गुन्हेगारीचे प्रमाण यंदा कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.

महापालिकेतर्फे पाणी चोरी प्रकरणात १२० गुन्हे दाखल झाले अाहेत. त्यामुळे चोरीच्या गुन्ह्याची अाकडेवारी फुगल्याचे ते म्हणाले. चोरी उघडकीस अाणण्याचे प्रमाण यंदा जास्त ठेवण्यासाठी प्रयत्न राहतील, असे ते म्हणाले. मोबाइल चोरी, वाहन चोरी, पाणी चोरी हेही गुन्हे अापण नोंदवून घेतले. खुनाचा प्रयत्न, दोन गटातील हाणामारी याप्रकरणातही गुन्हे नोंदवून घेतले अाहेत. बाहेरील जिल्ह्यातील चोरांचा वावर वाढला अाहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू अाहेत.
बातम्या आणखी आहेत...