आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर सुर्य तापला; सोलापूरचा पारा ४३.२० अंशावर; जलतरणासाठी वाढतेय गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह सोलापूरच्या तापमानात वाढ होत आहे. सोमवारी साेलापूरचे तापमान ४३.२ सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी ४२.६ सेल्सिअस असलेल्या तापमानात सोमवारी ०.६ सेल्सिअसने वाढ झाली. तापमान वाढल्याने दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट होता. मध्यवर्ती बाजारपेठा, शासकीय कार्यालयातदेखील शुकशुकाट जाणवत होता. 

उन्हाच्या कडक्यापासून बचाव होण्यासाठी अनेकांनी दुपारी घरा बाहेर पडणे पसंत केले. तर काहीनी डोळयावर गॉगल डोक्यावर टोपी घालून उन्हापासून बचाव करून घेतला. मागील काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, आणखी दोन ते दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 
 
हे ही वाचा...
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, चैत्र महिन्यात भुसावळात वैशाख वणवा पेटला त्याचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...